गुरुवार, २८ डिसेंबर, २०१७

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची अनोखी परीक्षा




पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी वाशिम जिल्ह्यात खाकी चा धाक निर्माण करून गुन्हेगारीवर वचक निर्माण केला आहे.  पोलीस अमलदारासह  पोलीस कर्मचारी कर्तव्यदक्ष आहे की नाही आणि तक्रारदाराला योग्य न्याय देतात की नाही याची चाचपणी केली .पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी बनावट तक्रारदार महिलेला आसेगाव पोलीस स्टेशनला पाठविले. महिलेने नाटक करून विनयभंग झाल्याचे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याना सांगितले. महिला पोलीस कर्मचारी  तनुजा राकेश यांनी महिलेला शांत करत बसायला खुर्ची दिली. प्यायला पाणी दिले .सौजण्याची वागणूक दिली .शांततेत तक्रार नोंदवून घेत घटनास्थळी भेट दिली .काही  बनावट तक्रारदारांनी  सोनसाखळी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली असता आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनस्यक जाधव यांनी लगेच एक्शन  घेतल्याने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या  परीक्षेत आसेगाव पोलीस स्टेशन प्राविण्यासह उत्तीर्ण झाले .पोलीस अधीक्षक महिला अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी महिला पोलीस कर्मचारी तनुजा राकेश यांना बक्षीस जाहीर केले आहे .  पोलीस अधीक्षक  मोक्षदा पाटील यांनी वाशिम जिल्ह्यातील  ठाणेदारांना  अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे .
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा