वाशिम : समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद,वाशिम या कार्यालयामार्फत 20 टक्के,जिल्हा परिषद सेस फंड व 7 टक्के वनमहसुल अंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षात वैयक्तीक लाभांच्या योजना 100 टक्के अनुदानावर डी.बी.टी. तत्वावर राबविण्यात येत आहे. मागासवर्गीय शेतकऱ्यांना इले.मोटरपंप पुरविणे, मागासवर्गीय शेतकऱ्यांना पी.व्ही.सी.पाईप पुरविणे, आदिवासी शेतकऱ्यांना इले.मोटरपंप पुरविणे, आदिवासी शेतकऱ्यांना पी.व्ही.सी. पाईप पुरविणेसाठी अर्जदार हा वाशिम जिल्हायातील ग्रामीण भागातील असावा एस.सी, एस.टी, व्ही.जे.एन टी, एस.बी.सी, या प्रवर्गातील राहीवासी असावा. अर्जदाराचे वार्षीक उत्पन्न रुपये 48000 चे आत असावे किंवा दारीद्रय रेषेखालील असावा, अर्जदाराच्या कुटुंबातील अर्जदारासह कोणत्याही व्यक्तीने यापुर्वी समाज कल्याण विभागामार्फत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराच्या कुटुंबामधील एकही व्यक्ती शासकिय व निमशासकिय सेवेमध्ये नसावा. अर्जदाराचे नावे 5 ऐकरापेक्षा जास्त शेतजमील नसावी. तसेच शेतीविषयी 7/12 चा उतारा व 8 अ असावा. 7/12 उतारा मध्ये विहीर असावी किंवा सक्षम अधिकाऱ्याचा सिंचन परवाना असावा. वरील साहीत्य लाभार्थ्याने विकत घेतल्यानंतर अर्जदाराने सदर साहीत्य त्याच कारणासाठी वापरणार असल्याचे ते विकणार नसल्याचे त्याचा दुरुपयोग करणार नसल्याचे दुसऱ्यास भाडयाने देणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे. लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर लाभार्थ्यांने मंजुर स्पेशिफिकेशन प्रमाणे साहीत्याची खरेदी केल्यानंतरच साहीत्य घेतल्याची खात्री करुन त्याच्या आधारसंलग्न खात्यात अनुदानाची रक्कम जमा (डी.बी.टी.) करण्यात येईल. त्याकरीता अर्जासोबत लाभार्थ्यांच्या बँक खात्याची पासबुकाची झेरॉक्सप्रत जोडावी.
इले.मोटरपंप योजनेकरीता अर्जासोबत लाभार्थ्यांने विदयुत मंडळाची डिमांड नोट, कोटेशन, टेस्ट रिपोर्ट जोडावा. इले. मोटरपंप योजनेकरीता अर्जासोबत सिंचनासाठी डिझेल इंजीन, मोटरपंप इत्यादी साहित्य उपलब्ध नसावे तसा तलाठी, ग्रामसेवक, पंचायत समिती, कृषि अधिकारी यांचा दाखला सोबत जोडावा, पी.व्ही.सी. पाईप योजनेकरीता अर्जासोबत सिंचनासाठी डिझेल इंजीन, इले. मोटरपंप इत्यादी साहित्य उपलब्ध असावे. तसा तलाठी, ग्रामसेवक, पंचायत समिती कृषि अधिकारी यांचा दाखला सोबत जोडावा. आदिवासी योजनांकरीता अर्जदार हा अनुसूचित जमाती प्रवार्गातील असावा. आदिवासी योजंनाकरीता अर्जदार हा वनक्षेत्र गावातील राहीवासी असावा. या योजनांच्या अर्जाचे नमुने संबधीत पंचायत समिती कार्यालयात तसेच समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, वाशिम येथे उपलब्ध असून इच्छुक अर्जदारांनी आपले परिपुर्ण अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रासह दि. 30 जानेवारी 2018 पर्यंत संबधीत पंचायत समिती कार्यालयात जमा करावे. असे आवाहन पानुताई जाधव, सभापती, समाज कल्याण समिती जिल्हा परिषद वाशिम व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम यांनी केले आहे.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा