शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन



वाशिम  :  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली व महिन्याच्या प्रत्येक तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार जानेवारी २०१8 महिन्यातील लोकशाही दिन सोमवार, दि. 1 जानेवारी २०१8 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालामध्ये आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी तालुकास्तर लोकशाही दिनांत तक्रार दाखल करुन 1 महिण्यापेक्षा जास्त कालावधी झाला परंतू त्यांची तक्रार निकाली निघालेली नाही अशा नागरिकांनी त्यांची तक्रार तालुका लोकशाही दिन, टोकन क्रमांक, दिनाक व आवश्यक कागदपत्रासह जिल्हा लोकशाही दिन वाशिम मध्ये 15 दिवसांचे अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. सोमवार, दि. 1 जानेवारी 2018 चे सभेत अशा तक्रारी स्विकारल्या जातील परंतू त्या प्रकरणाची सुनावणी माहे, फेब्रुवारी 2018 मध्ये होतील. त्या संदर्भात तक्रारदाराला जिल्हा लोकशाही दिनामध्ये हजर राहण्यासाठी पत्र देण्यात येईल. ज्या तक्रारी सरळ जिल्हास्तरावरील असतील तया तक्रारी थेट सोमवार, दि. 1 जानेवारी 2018 चे सभेत अशा तक्रारी आवश्यक कागदपत्रासह स्विकारल्या जातील परंतू त्या प्रकरणाची सुनावणी माहे फेब्रुवारी 2018 मध्ये होतील, त्या संदर्भात तक्रारदाराला लोकशाही दिन सभेला हजर राहण्यासाठी पत्र देण्यात येईल. ज्या नागरिकांना जिल्हा लोकशाही दिन वाशिम सभेला तक्रारीचे अनुषंगाने हजर राहण्याचे पत्र मिळाले आहे अशा नागरिकांच्या तक्रारीची सुनावणी सोमवार, दि. 01 जानेवारी 2018 रोजीचे सभेत होईल. ज्या नागरिकांच्या तक्रारी जिल्हा लोकशाही दिनांत समाविष्ट आहेत त्यांनी तक्रार निकाली होईपर्यंत प्रत्येक लोकशाही दिन सभेला हजर राहण्याची दक्षता घ्यावी. तसेच दि. 01 जानेवारी 2018 च्या सभेला हजर रहावे व विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक कागदपत्राच्या प्रति न जोडलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा