शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

युवक युवतींना प्रशिक्षणाची संधी


वाशिम :   प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,अकोला या कार्यालयाकडून न्युक्लिअस बजेट योजनाअंतर्गत सन 2017-18 वर्षात या प्रकल्प कार्यालयातील कार्यक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वाशिम जिल्हायातील विदयार्थ्यांकरीता आदिवासी युवक युवतींना एम. एस.सी. आय.टी संगणकाचे प्रशिक्षण देणे. आदिवासी युवक युवतींना संगणकावर इंग्रजी टंकलेखन 30 मी.प्र.श.चे.प्रशिक्षण देणे. आदिवासी युवक युवतींना संगणकावर मराठी टंखलेकन 30 मी.प्र.श.चे प्रशिक्षण देणे आदिवासी युवक युवतींना वैद्यकीय अभियांत्रिकी प्रवेश पूर्व प्रशिक्षण देणे. आदिवासींना रोजगारा उपलब्ध करुन देणेसाठी फलेक्स प्रिंटींग मशिनचे ऑपरेटर करण्याचे प्रशिक्षण देणे. आदिवासी युवकांना नळ फिटींगचे रोजगारविषयक प्रशिक्षण देणे आदिवासी युवतींना ब्युटीपार्लर किंवा ड्रेस डिझायनर कोर्स करीता प्रशिक्षण दणे आदिवासी युवकांना बॅगमेकींगचे प्रशिक्षण देणे आदिवासी युवकांना फर्निचर बनविण्याचे प्रशिक्षण देणे आदिवासी युवकांना वारली पेंटीगचे प्रशिक्षण देणे. आदिवासी युवकांना लॅपटॉप दुरुस्तीचे प्रशिक्षण देणे. आदिवासी युवकांना अग्निशामक चालविण्याचे प्रशिक्षण देणे. आदिवासी युवकांना केबल कनेक्शनचे प्रशिक्षण देणे.आदिवासी युवकांना सिमेंट काँक्रीटपासून खिडकी दरवाजे व टाके कुंडी तयार करण्याचे प्रशिक्षण देणे. आदिवासी युवकांना एसी दुरुस्तीचे प्रशिक्षण देणे. आदिवासी आश्रमशाळेतील इयत्ता 6 ते 8 पर्यंतच्या विदयार्थ्यांना रोबोटीक व सायन्स वर्कशॅापचे प्रशिक्षण देणे. आदिवासी विदयार्थ्यांना इर्न्व्हटर व बॅटरी रीपेरींगचे प्रशिक्षिण देणे. आदिवासी आश्रमशाळेतील वयोगट 5 ते 14 पर्यंतच्या विदयार्थ्यांना ॲबकसचे प्रशिक्षण देणे. आदिवासी विदयार्थ्यांना प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे प्रशिक्षण देणे. आदिवासी विदयार्थ्यांना स्वयंरोजगार व कला जोपासण्यासाठी गायन, हार्मोनियम, शास्त्रीय गायन, नृत्य व सुगमसंगीताचे प्रशिक्षण देणे. आश्रमशाळेतील 11 वी 12 वीतील विज्ञान शाखेतील विदयार्थ्यांना विशेष कोचींकव्दारे विदयार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे.
          तरी इच्छुक शासन मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्थांनी आपले प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला न्यु. राधाकिसन प्लॉट, माहेश्वरी भवन जवळ, महसूल भवन, अकोला येथे सादर करावेत. सदरचे प्रस्ताव करण्याकरिता विहित नमुन्यात अर्ज योजनेच्या अटी शर्ती इत्यादी दिनांक 1 जानेवारी 2018 पासुन कार्यालयीन वेळेत शासकिय सुटीचे दिवस सोडून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला येथे विहित नमुन्यातील अर्ज 500 रुपये प्रति प्रस्ताव दिनांक 8 जानेवारी 2018 पर्यंत सादर करावे. असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.  
                                                                              सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा