वाशिम, दि. 29 : जिल्हायातील सर्व शिधापत्रिकाधारकांना सुचित करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाने लक्ष निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत माहे, जानेवारी 2018 मधील विविध योजना निहाय वाटप परिमाण खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी प्रति व्यक्ती 4 किलो गहू व 1 किलो तांदुळ, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका 30 किलो गहू व 5 किलो तांदुळ आणि एपीएल शेतकरी लाभार्थी यांना प्रति व्यक्ती 4 किलो गहू व 1 किलो तांदुळ याप्रमाणे माहे, जानेवारी 2018 करीता वाटप परिमाण निश्चित केलेले असुन सर्व लाभार्थ्यांसाठी धान्याचे विक्री दर हे गहू 2 रुपये प्रतिकिलो व तांदुळ 3 रुपये प्रति किलो याप्रमाणे आहेत. जिल्हायातील सर्व अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकांना प्रति कार्ड 1 किलो साखर किरकोळ विक्री दर 20 रुपये प्रमाणे आहे.
जिल्हायात वितरीत होणाऱ्या केरोसीनचे दर वाशिम, 23.30 रु. मालेगांव, रु.23.15 रिसोड,रु. 23.40 मंगरुळपीर, रु.23.20 मानोरा, रु. 23.40 व कारंजा 23.30 प्रति लिटर या प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. जिल्हायातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी याची नोंद घ्यावी. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
सम्राट टाइम्सन्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा