शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

22 वर्षीय युवतीच्या हाती सरपंच पदाची धुरा



रिसोड: तालुक्यातील वाघी खुर्द ग्रामपंचतीच्या इतिहासात प्रथमच आशादायक वातावरण निर्माण झाले असून वाघी खुर्द ग्रामपंचायतिच्या सरपंच पदाची धुरा गोंड कोळी समाजाच्या हाती आली. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी सरपंच म्हणून निवडून आलेल्या वाघी खुर्द येथील सौ.सुषमा आकाश लोखंडे या युवतीने 29 डिसेंबरला पदाचा कारभार स्वीकारला.यामुळे गावातील समाजबाधवानी एकच जल्लोष केला.
रिसोड तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यंत एखाद्या ग्रामपंचायतीचा अपवाद वगळल्यास येव्हढ़या कमी वयात फारसे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही.यंदा मात्र थेट जनतेतून झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडत असलेल्या त्या अविरोध निवडून आल्या.तसेच  उपसरपंचपदी सुधाकर चिनकुजी मोरे यांचीसुद्धा बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत वाघी खुर्द येथे शुक्रवार दि.29 डिसेंबरला ग्रामपंचायतची पहिली सभा नवनिर्वाचित सरपंच सौ.सुषमा आकाश लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेमध्ये नवनिर्वाचित सदस्यांमधून उपसरपंच पदाची निवड करण्यात आली. उपसरपंच पदासाठी सदस्यांमधून सुधाकर चिनकुजी मोरे यांचा एकच नामांकन अर्ज भरण्यात आला होता.या नामांकन अर्जावर चर्चा होवून सर्वानुमते उपसरपंचपदी सुधाकर चिनकुजी मोरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय निरीक्षक अधिकारी प्रा.खोटेसाहेब,तसेच सहाय्यक ए.व्ही.लहाने साहेब,तर सहाय्यक म्हणून तलाठी बाविस्कर साहेब,ग्रामसेवक बोरकर साहेब,शिरपुर पोलिस स्टेशन बिट जमदार इप्परसाहेब,पोलिस पाटिल शेख शेगिर शेख मुनाफ,ग्रा.पं.सेवक शेख महेबूब यांनी निवडणूकीचे काम पाहीले.तसेच ग्रा.पं. वाघी खुर्दची निवडणूक 7 ऑक्टोंबर रोजी पार पडली.तर निकाल 9 तारखेला लागला होता.
या निवडणूकीत जनतेमधून सौ.सुषमा आकाश लोखंडे यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड झाली. या दिवसी नवनिर्वाचित उपसरपंच सुधाकर मोरे आपल्या भाषणात म्हणाले की, सर्वाच्या सहकार्यातुन गाव स्वच्छ व समृध्दहोण्यासाठी उपसरपंच या नात्याने मी प्रयत्नशिल राहील. गावकर्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास खरा ठरवुन सर्वाच्या सोबतीने गावाचा सर्वागीण विकास साधण्यासाठी मी आणि सरपंच कटीबध्द राहील. असे आस्वासन दिले.या पदग्रहण कार्यक्रमाला नवनिर्वाचित सदस्य शेख सुलतानाबी शेख सईद,शेख नजमुन्निसा शेख सम्मद,सौ.मनीषा विजय डांगे,सौ.शारदा एकनाथ मोरे,सौ.ज्योती रामदास खरात,सय्यद रसीदाबी सय्यद खुर्शीद तसेच माजी सरपंच मनोहर मोरे,सिद्धार्थ भालेराव,देवीदास खरात,नारायण खेकाळे,प्रकाश भालेराव,शेख यूनिसभाई,माजी ग्राम पं.सदस्य शेख रसीद शेख लतीफ,हरिभाऊ खरात,शेख रसीद,शेख आसपाक,लक्ष्मण जावळे,महादेव खरात,रामदास खरात,शेख फारूकभाई,शेख वाजिद,संजू मोरे,संजू भाऊ जगदाळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित तसेच सरपंच व उपसरपंच यांचा ग्रामस्थांनी पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करुण गावकर्यानी या निवडीचे जल्लोषात स्वागत केले..
सम्राट टाइम्स न्यूज 
सिद्धार्थ भालेराव.
9552978172

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा