वाशिम -- रिसोड तालुक्यातील वाकद येथील सौ. रेखा प्रकाश मोरे व तिचे दोन मुले व मुलगीसह दिनांक 26 डिसेंबर रोजी आमरण उपोषणास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले होते.त्या महिलेच्या मागण्या आपला पती प्रकाश मोरे हा गेल्या सहा वर्षापासुन मारहाण करूंन छळ करीत आहे.या संदर्भात उपोषणकर्त्या सौ.रेखा मोरे यांनी रिसोड पोलिस स्टेशन मधे पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.पण पोलीस स्टेशन रिसोड यांनी यावर कोणतीच दखल घेतली नाही. यामुळे पतीने परत महिलेस व मुलांना मारहाण व छळ करण्यास सुरवात केली.एवढेच काय तर महिलेला घराच्या बाहेर काढून दिले.घरातील सामानाची नासधुस केली.म्हणून सौ रेखा मोरे यांनी आपल्याला न्याय मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 डिसेंबर पासून उपोषनास सुरवात केली.या उपोषनाची माहिती घेवून पोलीस उपविभागीय अधिकारी प्रियंका मिना यांनी दिनांक 29 डिसेंबर रोजी भेट देवूंन सविस्तर माहिती घेतली.आणि रिसोड चे ठाणेदार व सौ रेखा मोरे चे पती यांना बोलावून घेवून पतीला समज दिली.आणि यापुढे पीडित महिलेला त्रास होता कामा नये म्हणून पोलीस स्टेशन रिसोड मधे प्रकाश मोरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करूंन योग्य कार्यवाही करन्यास ठाणेदार यांना सांगितले .असे आश्वासन देवूंन पोलीस उपविभागीय अधिकारी प्रियंका मिना यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले.यावेळी रिसोडचे ठाणेदार पाटिल व डॉ .पदविधर संघटनेचे अजय ढवळे,हरिदास बन्सोड,राजकुमार पडघाण,प्रविण पट्टेबहादुर,सिद्धार्थ खंडारे,व सामाजिक कार्यकर्ते संतोष इंगळे, उपोषणकर्त्या महिलेचे वडील ठाकुर, आदिसह अनेकांची उपस्थिती होती.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा