शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

रिसोड आगारातून रातराणी गाड्या सुरू करण्याची भाजपाची मागणी*



  एस.टी प्रशासनाचा थंड प्रतिसाद                      


रिसोड आगारातून पुणे, नागपूर,पंढरपूर इत्यादी लांब पल्ल्याच्या ठिकाणी रातराणी गाड्या सुरू करण्याची मागणी भाजपा च्या वतीने दि.२७डिसेंबर ला करण्यात आली. रिसोड  हे व्यापारी दृष्टीने महत्वाचे ठिकाण असून व्यापरिक दृष्टीने पुणे,औरंगाबाद,नागपूर याठिकाणी तर धर्मीक वृत्तीचे असंख्य नागरिक पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूर ला जात असतात याठिकाणी रात्रीची गाडी नसल्याने अधिकचा वेळ तर जातोच परंतु  प्रवाश्यांची गैरसोयसुद्धा होते. नागरिकांच्या भावना आगार व्यवस्थापका पर्यंत पोहचविणारे व गाड्या सुरू करण्याचे निवेदन भाजपा शहराध्यक्ष दीपक सोनुने यांच्या नेतृत्वात बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आगार प्रमुखांना देण्यात आले.
सदर ची मागणी सातत्याने होत आहे परंतु तुम्ही करा वटवट आम्ही मात्र निब्बरघट अशी परिस्थिती मागणी कारणारांची झाली आहे. आगार व्यवस्थापक केवळ आश्वासनाचा नारळ  देऊन  मागणि कर्त्यांना परत पाठवितात. मागणीचा   कोणत्याही प्रकारे पाठपुरावा केला जात नाही. तसेच बस स्थानकातील अस्वच्छता तर कायम शहराच्या स्वच्छता अभियानाला कलंकित करीत आहे. अनेक समाजसेवेचे आंबटशौकीन एक दिवस साफसफाई करून फोटो काढण्या पालिकडे स्थानकाच्या स्वच्छतेशी संबंध ठेवत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
 भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या निवेदनाची तरी दखल घेतली जाईल व रातराणी गाड्या व स्वच्छ बस स्थानक परिसर होईल अशी अपेक्षा आहे.सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विविध कारणाने बस फेऱ्या  रद्द केल्या जातात हा प्रकार बंद करण्याची ताकीद सुद्धा निवेदनात दिली आहे. निवेदन देतांना शहराध्यक्ष दीपक सोनुने सह शहर उपाध्यक्ष गजानन फुके,शहर सरचिटणीस श्रीकांत संत,सरचिटणीस सुनील धुत,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सुरज भाई,व्यापारी आघाडी शहर अध्यक्ष सतिशजी दलाल,सुनील खके, गजानन साबळे,भीमा माळेकर श्रीनिवास तोतला, जयंत वसमतकर,बंडू सरोदे,कुणाल जुमडे, गोपाल गरकळ,राहुल जुमडे, गोविंद भुसारी, रोशन वाघ,ओंकारअण्णा मिटकरी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड प्रतिनिधी 9960292121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा