शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

मंगळवारी वाशीम मध्ये प्रा.श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान



वाशीम : क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीआई फुले व राजमाता राष्टमाता माॅ साहेब जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त वाशीम शहरामध्ये प्रा.श्याम मानव संस्थापक -संघटक, अखिल भारतीय अंनिस तथा सहअध्यक्ष ,महाराष्ट्र शासन यांचे स्त्रियांचं लैंगिक शोषण करणाऱ्या बाबा -बुवांची लक्तरं वेशीवर टांगणार आणि चमत्कार प्रात्यक्षिकांसह जाहीर व्याख्यान विषय वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया आणि जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर  मंगळवार दिनांक  2 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी 6 वाजता विठ्ठलवाडी मंगल कार्यालय येथे संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने आयोजित केले आहे.
        यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष सुभाषराव बोरकर ,संजय नाटेकर (एन आर.आय) लंडन चे हे उपस्थित राहणार आहेत. तरी वाशीम जिल्ह्य़ातील सर्व जनतेनी ह्या प्रबोधन कार्यक्रमाचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष गजानन भोयर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा