शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

कारंजा तालुक्यातील टाकळी खु. येथील सरपंच अपात्र


वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड तहसील अंतर्गत येत असलेल्या टाकळी खु. येथील सरपंच अपात्र असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल त्रिवेदी यांनी दिले. टाकळी खु. येथे नुकतीच थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक पार पडली या मध्ये टाकळी येथील सतीश जानराव वानखडे हे सरपंच पदी निवडून आले. मात्र त्यांच्या विरुद्ध टाकळी येथील विरोधी बाबाराव रामकृष्ण डोंगरे यांनी माहिती अधिकाऱ्या अंतर्गत तक्रार दाखल केली असता न्यायालय वाशीम यांनी अपात्र असल्याचे सांगितले. सतीश वानखडे आज सरपंच पदी विराजमान होणार होते मात्र जिल्हाधिकारी राहुल त्रिवेदी यांनी अपात्र असल्याचे आदेश दिले. त्यामुळे टकळी येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गावामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कारंजा तहसीलदार सचिन पाटील यांनी पोलिसांना पाचारण केले. याबाबत आमचे सम्राट टाईम्स लाईव्ह प्रतिनिधी विनोद नंदागवळी यांनी तक्रारदार बाबाराव डोंगरे यांची घेतलेली प्रतिक्रिया . 
    विनोद नंदागवळी मो. ९६७३९५४५१६ सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा