मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे मालेगाव पोलिसांनी वरली मटका अड्ड्यावर धाड टाकून हजारो रुपयांचा माल जप्त करण्याची कार्यवाही आज दुपारी 1 :30 वाजता केली.
मेडशी येथे वरली मटका सुरू झाल्याची माहिती मालेगाव पोलिसांना मिळताच ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांनी स्वतः पोलीस ताफ्यासह वरली मटका अड्ड्यावर धाड टाकली.
पोलिसांची छापा पडताच सर्वत्र पळापळ झाली. पोलिसांनी शेख गुलाम व शिंदे दोघांना पकडले. पोलीस कार्यवाहीत अंदाजे 10 हजार रुपये रोख रक्कमसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे , पोलीस नाईक संदीप निखाडे,पोलीस नाईक गजानन झगरे,पोलीस नाईक संदीप गायकवाड,जमादार रमेश जायभाये, पोलीस कर्मचारी टाले, पोलीस कर्मचारी माणिक खडसे यांनी केली
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा