शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण ठार

( संग्रहीत फोटो ) 


अकोला -हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रिधोरा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत   हरीण जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी 2 वाजता घडली .
अकोला- हैदराबाद महामार्गावर दुपारी 2 वाजता हरीण रस्ता पार करीत असताना अज्ञात वाहनाणे हरणाला जबर धडक दिली. अपघातात हरीण जागीच ठार झाल्याची घटना घडली .घटनेची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी एन .आर. राऊत  यांना मिळताच ते  वनताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले . हरणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मेडशी येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात करण्यात आले.  येथील वन विभागाच्या  शासकीय लाकूड आगारात हरणावर अंत्यसंस्कार करण्यात येऊन दहन करण्यात आले 

सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा