मंगरुळपीर-तालुक्यातील शेलुबाजार येथील निर्मललादेवी जैन शाळेमध्ये दि.२९ रोजी झालेल्या विज्ञान प्रदर्शनीमध्ये अनू.जाती मूलांची शासकिय निवासी शाळा,तुळजापुर मंगरूळपीर च्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातुन व्दितीय पारितोषीक पटकावीले आहे.
राज्य विज्ञान संस्था नागपुर,शिक्षण विभाग जि.प.वाशिम,विज्ञान अध्यापक मंडळ शिक्षण विभाग पंचायत समिती मंगरुळपीर व निर्मलादेवी जैन काॅन्व्हेंट आणी हायस्कुल शेलुजार यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२९ रोजी शेलुबाजार येथे विज्ञान मेळाव्याचे आयोजन करन्यात आले होते.यामध्ये येथील अनू.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा तुळजापुर च्या यश कटके आणी वैभव जामनिक या विद्यार्थ्यांनी पवन ऊर्जेच्या साहाय्याने विद्यूत निर्मीतीचे माॅडेल बनवून ऊत्कृष्ट प्रेंझेंटेशन केले त्यामूळे या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये व्दितीय क्रमांक पटकावला व मान्यवरांच्या हस्ते प्रमानपञ वाटप करन्यात आले.या प्रदर्शनासाठी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण सुरजुसे, विज्ञानशिक्षक सुमेध चक्रनारायण,सातपुते,फुलचंद भगत,राष्टपाल आडोळे,घरडे,कोमल मेश्राम,रविद्र चव्हाण आदी शिक्षकांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सम्राट टाईम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा