सम्राट टाईम्स लाईव्ह,सबसे तेज
मंगरुळपीर-शहरात वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या बेकायदेशीर खाजगी क्लासेसचे पेव फुटले आहे.यात शिकण्यासाठी आजूबाजूच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींची मोठी संख्या आहे.परंतु,त्यांच्या सुरक्षेची कुठलीही काळजी घेण्यात येत नाही.त्यामुळे अशा क्लासेसच्या संपर्कात असणाऱ्या रोड रोमियोंचे फावत असून निष्पाप मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या अनेक घटना घडत आहेत.या बेकादेशीर क्लासेसवर नियंत्रण कोणाचे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.या शिकवणी क्लासेवर सिसिटिव्हीची नजर आणी पोलिसांची गस्त वाढविल्यास चिडिमारांचे धाबे दणानतील आणी बेकायदेशीस क्लासेवर आळा घालुन त्यांचेवर योग्य कारवाई केल्यास अनूचित प्रकार टळेल अशी पालकांमधुन मागणी होत आहे.बेलगाम फी विद्यार्थ्यांकडुन वसुल करुन नियमबाह्य पध्दतीने क्लास सुरु करन्याची मंगरुळपीर शहरात जणू चढाओढच लागली असुन या शिकवणी वर्गावर प्रशासनाचे कुठलेही नियंञण नसल्यामुळे नियमबाह्य असुनही संबधित प्रशासनाकडुन कारवाई माञ शुन्य आहे असे चिञ दिसत आहे.शिक्षणविभागाने अशा नियमबाह्य क्लासेसवाल्यावर वेळीच कारवाई करने गरजेचे आहे.
फुलचंद भगत
मो.9763007835
सम्राट टाईम्स लाईव्ह
===============
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा