शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

लॉ. वसंतराव धाडवे यांच्या प्रयत्नाने बचत गटातील महिलांना मिळाला न्याय


वाशीम, 30 डिसेबर 
महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्त्री धन सुरक्षा योजने अंतर्गत मंगरुळनाथ तालुका ग्रामीण भागातील महिलांनी तीन वर्षाकरीता दामदुप्पट या करारावर प्रत्येकी पाच हजार  प्रमाणे 65 महिलांनी पैशाची गुंतवणूक केली होती. परंतु, योजना तोट्याचे आल्याचे कारण सांगून बॉन्डपेपरवर  केलेल्या करारनुसार पैसे दुप्पट देण्यास असमर्थता दर्शविली होती. मात्र, येथील भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते समाजसेवक लॉ. वसंतराव धाडवे यांनी माविमंचे जिल्हा समन्वयक नागापूरे यांची भेट घेवून सदर महिलांना त्यांचे हक्काचे पैसे देण्याबाबत चर्चा करुन महिलांना न्याय मिळवून दिला.  
महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत स्त्री धन सुरक्षा योजनेत मंगरुळनाथ तालुका ग्रामीण भागातील 65 महिलांनी प्रत्येकी 5 हजार रुपये सदर योजनेत गुंतवणूक केली होती. त्यासाठी उसनवारी, कर्ज, अभुषणे गहाण ठेवून या योजनेत पैशाची गुंतवणूक केली. या योजनेअंतर्गत तीन वर्षात पैसे दुप्पट होणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगीतले. तसा 100 रुपये बॉन्डपेपरवर महिला व बचत गटाअंतर्गत कररारनामा झाला होता. परंतु, मुदतीअंती सदर महिला दुप्पट रक्कम घेण्यासाठी माविमं कार्यालयात गेल्या असता तेथील अधिकार्‍यांनी ही योजना तोट्यात आल्याचे सांगून दुप्पट पैसे न देता प्रतिवर्षी 400 रुपये ज्यादा देण्यात येतील,असे सांगीतले. मात्र, महिलांनी आम्हाला दुप्पट रक्कम म्हणजेच 10 हजार रुपये देण्यात यावे, अशी विनंती केली.  परंतु, अधिकार्‍यांनी नकार दिल्यामुळे बचत गटाच्या महिलांनी वाशीमचे सामाजिक कार्यकर्ते वसंतराव धाडवे यांची भेट घेवून त्यांना वस्तुनिष्ठता कथन केली. यावेळी लॉ. वसंतराव धाडवे यांनी क्षणाचाही विलंब महिलांना सोबत घेवून माविमं कार्यालय गाठले व तेथील जिल्हा समन्वयक नागापूरे यांची भेट घेवून महिलांच्या रास्त मागणीबाबत सविस्तर चर्चा केली. महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे न मिळाल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल, असा इशारा दिल्यानंतर सबंधित अधिकारी यांनी सामंज्याशी भूमीका घेत पुर्वी वर्षाकाठी 400 रुपये ज्यादा  देण्याचे ठरविले होते. त्यात वाढ करुन आता प्रतिवर्षी 750 रुपये देण्यात येतील व वरिष्ठांशी चर्चा करुन या योजनेसाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर उर्वरीत रक्कम सबंधित महिलांना देण्यात येईल, असे लेखी पत्र देवून आश्‍वासीत केले.   त्यावरुन समाजसेवक वसंतराव धाडवे यांनी सबंधित महिलांशी चर्चा करुन त्यांना तात्पुरते आंदोलन मागे घेण्यास सुचविले. लॉ. धाडवे यांनी सबंधित अधिकार्‍यांकडून तशा प्रकारचे लेखी देण्याचे मान्य करुन हा प्रश्‍न सामंज्यसाने सोडवून  महिलांना न्याय मिळवून दिला. त्याबद्दल महिलांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी बचत गटाच्या प्रमुख सौ. चंचल खिराडे यांच्यासह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. 
सम्राट टाइम्स न्युज नेटवर्क 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा