शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

अवैद्य विदेशी दारूने भरलेला टाटा वाहनसह 4 लाख 30 हजाराचा मुद्देमाल केला जप्त



👉 रुजू होताच  सिंघम  किरणकुमार साळवे यांची धडक  कार्यवाही 

महादेव हरणे किन्हीराजा
  मालेगाव तालुक्यातील  जऊळका पोलीस स्टेशनला ठाणेदार किरणकुमार साळवे रुजू होताच त्यांनी  लाखो रुपयाच्या विदेशी दारुसह 4 लाख 30 हजार 53 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची धडक  कार्यवाही केली .सदर कार्यवाही  दि 29 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता नागपूर मुबई महामार्गावर करण्यात आली . किरणकुमार साळवे रुजू होताच त्यांनी पहिलीच धडक कार्यवाही केल्याने अवैद्य धंदे करण्याऱ्याच्या उरात धडकी भरली आहे .
नागपूर मुंबई राष्ट्रीय महासमार्गावर विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार किरणकुमार साळवे यांना मिळाली . ठाणेदार साळवे यांनी  सापळा  रचला. कारंजावरून वाशिम कडे अवैध विदेशी दारूने भरलेला टाटा क्रमांक महा. ०४ डीएस १७६८  भरधाव वेगाने जात असताना ठाणेदार किरण साळवे यांनी पोलीस ताफ्यासह टाटा वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग केला .अखेर वाहन किन्हीराजा जवळ पकडण्यात साळवे यांना यश आले. वाहनचालक अब्दुल जावेद अब्दुल कयूम वय ३५ वर्ष रा शिवनी जिल्हा वाशिम याने उडवाउडवीची उत्तरे दिली. ठाणेदार किरणकुमार साळवे यांनी पंचासमक्ष वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये 1 लाख  30 हजार 53 रुपयांची अवैध विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी लाखो रुपयांच्या विदेशी दारुसह 4 लाख 30 हजार 53 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .पोलीस स्टेशनला वाहन चालक अब्दुल जावेद अब्दुल अब्दुल कयूम,एस डी तायडे सह अकोला येथील युनायटेड डिस्ट्रिब्युटर चे मालक  यांच्या विरुद्ध अप नं 330/ 17 कलम 81,82,83, महाराष्ट्र दारूबंदी कायदा सन 1949 अन्वये गुन्ह्याची  नोंद करण्यात आली . सदर कार्यवाही ठाणेदार किरणकुमार साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आरसेवार ,जमादार संतोष कोहर ,जमादार वानखेडे  शिवाजी काळे सह वाहन चालक जमादार शकील यांनी केली.
ठाणेदार किरणकुमार साळवे जऊळका पोलीस स्टेशनला रुजू होताच गुन्हेगारीवर अंकुश  बसविला आहे.

🖋महादेव हरणे कार्यकारी संपादक
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
📲 9922224889

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा