रविवार, २४ डिसेंबर, २०१७

योगगुरु रामदेवबाबा योग शिबीराच्या स्वागताध्यक्षपदी आ. पाटणी


वाशिम :  येथे येत्या फेब्रुवारी महिन्यात योग महर्षि रामदेव बाबा यांच्या उपस्थितीत होणार्‍या योग प्राणायाम शिबिराची जय्यत तयारी सुरु असून हे शिबिर ऐतिहासिक ठरणार आहे.
    या कार्यक्रमासाठी विविध समाजामधुन दानदाते सुद्धा समोर येत असुन कार्यक्रमासाठी प्रामुख्याने हातभार लावून कारंजा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी या शिबीराच्या स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारुन शिबीराच्या यशस्वीतेसाठी जास्तीत जास्त सहकार्य करण्याची इच्छा दर्शविली. आ. पाटणी यांनी शिबीराच्या स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्याबद्दल पतंजली योग समितीचे माजी जिल्हा अध्यक्ष रुपेश लढ्ढा, कोषाध्यक्ष भगवान वानखडे, संदीप बाहेती, सागर दायमा, सी. ए. आनंद डोडीया, डॉ. सुनील गट्टाणी, डॉ. नारायण डाळे, डॉ. जगदीश बोरा, सौरभ गट्टाणी, मोहनीश लढ्ढा, अंकुश सोमाणी, पियूष अग्रवाल यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन केले.
    स्वामी रामदेव बाबा द्वारा वाशिम सारख्या गावात योग शिबीर होत असल्यामुळे जिल्हयात उत्साहाचे वातावरण पसरले असून या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जे.सी.आय वाशिम सीटी, मारवाडी युवा मंच, लॉयन्स क्लब, रोटरी क्लब, मेडिकल असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन, गायत्री मंडळ, गावखेड्यातील भजनी मंडळी आदी विविध सामाजीक व धार्मिक संघटनांचे सहकार्य मिळत आहे. या योग शिबीरामध्ये जिल्हाभरातुन जवळपास 1 लाख लोक येण्याची शक्यता असून तशी जय्यत तयारी पतंजलि योग समितीव्दारे करण्यात येत आहे.
    सदर शिबीर यशस्वी करण्याकरीता माजी जिल्हा अध्यक्ष रूपेश लढ्ढा, सह राज्य प्रभारी युवा भारत महाराष्ट्र पूर्व शंकर नागापुरे, संघटन सचिव युवा भारत महाराष्ट्र राज्य राम व्यवहारे, जिल्हा संरक्षक देविदास पाटील, भारत स्वाभिमान जिला प्रभारी गजानन धर्माळे, पतंजलि जिल्हा प्रभारी शिवशंकर भोयर, युवा भारत जिल्हा प्रभारी कैलास भटकर, किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी शंकर ठाकरे, प्रांतीय सदस्य रामदास धनवे, जिल्हा महिला प्रभारी लताताई धनवे, जिल्हा महिला महामंत्री स्वातीताई नागापुरे, जिल्हा संघटन मंत्री दिपाताई वानखडे, जिल्हा कोषाध्यक्ष भगवंतराव वानखडे, सोशल मिडीया जिल्हा प्रभारी डॉ. प्रशांत जाधव हे प्रयत्न करीत आहेत. तसेच विविध सामाजिक संघटनांनी समोर येवून या कार्यक्रमात आपले सहकार्य करावे असे आवाहन पतंजली योग समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा