रविवार, २४ डिसेंबर, २०१७

मंगरूळपीरला 26 व 27 डिसेंबरला जलसंधारणाच्या प्रदर्शनीचे आयोजन



पाणी फांउडेशनचा स्तुत्य उपक्रम 

मंगरूळपीर दि. 23 पाणी फांउडेशन व शासनाच्या संयुक्त विदयमाने सुरू असलेल्या सत्यमेव जयते वाॅटर कप 3 करीता मंगरूळपीर तालुक्याची निवड करण्यात आली असून गावक-यांना श्रमदान व लोकसहभागाच्या माध्यमातून दुष्काळावर मात करणा-या स्पर्धेची माहीती व्हावी, त्याकरीता प्रदर्शनीचे आयोजन 26 व 27 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन 26 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते मंगरूळपीर पंचायत समितीच्या प्रांगणात व सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. प्रदर्शनीचा लाभ गावक-यांनी व शहरातील पाणी चळवळीत काम करणा-या नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन मंगरूळपीर प्रशासन व पाणी फांउडेशन टीम च्या वतीने करण्यात आले आहे. 

26 व 27 डिसेंबर या दिड दिवसात होणा-या प्रदर्शनीचे उद्घाटन मतदार संघाचे आमदार लखन मलीक यांच्या हस्ते होणार तर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय महसुल अधिकारी राजेश पारनाईक व प्रमुख अतिथी म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, वसंतराव नाईक महाविदयालाचे प्रमुख आत्माराम नाईक, जि प उपाध्यक्ष चंद्रकांतजी ठाकरे, प स सभापती निलीमा देशमुख माजी जि.प.सदस्य लक्ष्मीकांजी महाकाळ, उपसभापती सुभाष शिदे, शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेश पाटील, भाजप नेते सुरेश लुंगे, मंगरूळपीर नगर पालीकेच्या नगराध्यक्षा यास्मीन गझाला, माजी नगराध्यक्ष चंदुभाऊ परळीकर, दर्गाहचे अध्यक्ष शमशोद्दीन जहागीरदार, बिरबलनाथ संस्थानचे सचिव रामकुवार रघुवंशी, तहसीलदार वैशाख वाहुरवाघ,, ठाणेदार रमेश जायभाये ,गटविकास अधिकारी एन टी खेरे, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, कृषी अधिकारी प.स. पी एस शेळके, तालुका आरोग्य अधिकारी प्रदीप नव्हाते, अॅड नरेश मुळे, डाॅ चंद्रकांत राठी, शिवसेना तालुकाध्यक्ष अनिल राऊत, काॅग्रेस कमेटीचे अध्यक्ष अॅड प्रकाश इंगोले, भारीप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष शंकर तायडे, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे मंगरूळपीर तालुकाध्यक्ष आर. के राठोड, ,तनिष्काच्या  तालुका अध्यक्ष राधाताई केदार, ूमागील वर्षी पाणी फांउडेशच्या स्पर्धेत तालुक्यात प्रथम आलेल्या जयपुर गावचे सरपंच विजय काळे, पाणी फांउडेशचे प्रशिक्षक पवन मिश्रा, नगर पालीकेचे नगरसेवक ठाकुर सर यांच्या उपस्थित होणार आहे.

या प्रदर्शनीत मागील वर्षी झालेल्या वाॅटर कप 2 व 3 ची यशोगाथा फोटोच्या माध्यमातून प्रदर्शन पाहायला येणा-यांना पाहायला मिळणार आहे. तसेच गावांना सहभागी होण्यासाठीचा फाॅर्म भाग 1 प्रदर्शनीच्या ठिकाणी सरपंच व ग्रामसेवक यांना मिळणार आहे. या प्रदर्शनीच्या कार्यक्रमात दुष्काळाशी दोन हात ही फिल्म दाखविण्यात येईल. व तुफांन आलंय या गीतांने कार्यक्रमाची उद्घाटन कार्यक्रमाची सांगता होणार आहे. प्रदर्शनीचा तालुक्यातील सन्मानीय जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पत्रकार बांधव, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, रोजगार सेवक, अंगणवाडी सेवीका, आशा, मतदनिस तसेच पाणी या चळवळीत काम करणा-या सामाजिक संस्थेने तसेच शाळा महाविदयालयातील विदयाथ्र्यांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन मंगरूळपीर तहसिलचे तहसिलदार वैशाख वाहुरवाघ, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे व पाणी फांउडेशन टिम कडून करण्यात आले आहे. 

 बाॅक्स 

प्रदर्शनाचा ठिकाणी भाग 1 फार्म भरून गावांना सहभागी होता येईल.

पाणी फांउडेशन कडून राबविण्यात येणा-या सत्यमेव जयते वाॅटर कप 3 करीता मंगरूळपीर तालुक्याची निवड करण्यात आली. वाॅटर कप स्पर्धेत सहभागी होण्याचे गावांना ठरवायचे त्यामुळे सहभागी होण्यासाठी प्रदर्शनाच्या ठिकाणी फार्म भाग 1 हा ठेवण्यात आला आहे. या फार्म सरंपच व सचिव यांनी भरून दयायचा आहे. स्पर्धेत तालुक्यातील प्रत्येक गावांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासन व पाणी फांउडेशनच्या वतीने करण्यात आले. 

     फुलचंद भगत
सम्राट टाईम्स
मो.9763007835          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा