रविवार, २४ डिसेंबर, २०१७

तेजराव वानखडे यांचे सामाजीक कार्य कौतुकास्पद - माजी आ. कांबळे


गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण व वृक्षारोपण
वाशीम - राजकारणात अनेक जण येतात अन जातात मात्र राजकारणात राहून सामाजीक बांधीलकी जोपासून गरजवंतांना मदत करण्याचे कार्य केवळ बोटावर मोजण्याइतके राजकारणी यांच्या हातून घडत असते. रिपाई आठवले गटाचे जिल्हयात संघटन निर्माण करुन सर्वधर्मियांना सोबत घेवून कार्य करणारे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांनी सामाजीक बांधीलकीतून गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण तसेच वृक्षारोपण करीत पर्यावरणाचा संदेश दिला आहे. वानखडे यांचे सामाजीक कार्य कौतुकास्पद असून जिल्हयातील राजकारणाला समाजकारणाची जोड देण्यात आल्याचे प्रतिपादन माजी आमदार भिमराव कांबळे यांनी केले.
    स्थानिक रेखाताई कन्या विद्यालयात 23 डिसेंबर रोजी रिपाईचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांच्या वतीने गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण व वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन त्यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी सर्वप्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तदनंतर माजी आ. कांबळे यांच्या हस्ते वानखडे यांचा शाल, श्रीफळ देवून भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात मंचावर रिपाइंचे कार्याध्यक्ष शेषराव मेश्राम, तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, जिल्हा उपाध्यक्ष मोहनसिंग राठोड, आश्रुजी रोकडे, मालेगाव तालुकाध्यक्ष प्रकाश गवई, डॉ. चंद्रशेखर, हिरामन साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वानखडे व मान्यवरांच्या हस्ते सर्व गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तदनंतर वानखडे म्हणाले की, आज निराधारांना आधार देणार्‍या उपक्रमाची खरी गरज आहे. राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राजकारणातून समाजकारणाची मुहुर्तमेढ रोवुन गरजवंतांना मदत करण्याचा संदेश दिला आहे. सोबतच सर्वधर्मिय समाजाला प्रतिनिधीत्व देण्याकरीता त्यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या संकल्पनेतूनच हा कार्यक्रम आयोजीत केला आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मान्यवरांनी वानखडे यांच्या उपक्रमाचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन अरविंद उचित यांनी तर आभार शेषराव मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला माजी सरपंच कैलास पवार, रामदास भगत, कैलास मैंदकर, रवि भगत, प्रमोद कोकरे, विष्णू वानखेडे, भारत कांबळे, संदीप वैद्य, अंभोरे, सिध्दार्थ पाटील, पंढरी कंकाळ, भिमराव लबडे, धनंजय कांबळे, दिलीप कांबळे, प्रमोद खडसे, विष्णू कांबळे, सुभाष वानखडे, राहुल सुर्वे, विश्वनाथ दिघोळे, लोडजी भगत, गोविंदराव इंगोले, मोहन कांबळे, फेडरेशनचे काशीराम राऊत, शाहीर विश्वनाथ इंगोले, सुखदेव सरकटे, उल्हास इंगोले, माजी उपसरपंच इंगळे, संजय गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते. यावेळी शाळा परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा