यावर्षीच्या कपाशीचा हंगाम मातीमोल
शासनाच्या ठोस मदतीची बळीराजाला अपेक्षा
मंगरूळपीर :-तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कपाशीवर मोठ्या प्रमाणावर बोंडअळी पडल्यामुळे यावर्षीचा शेतकऱ्यांचा हंगाम मातीमोल गेला आहे. लागवडीचा खर्च सुध्दा निघत नसल्यामुळे कर्जाच्या बोज्याखाली दबलेला मंगरूळपीर तालुक्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या पुन्हा खचल्याने सरकारने पुढाकार घेवून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत देवू केली पण अजुनही यावर ठोस ऊपाययोजना कराव्यात व शेतकर्यांना मदतीचा हात द्यावा आणी बळीराजाचे मनोबल वाढवावे अशी आशा व्यक्त केल्या जात आहे.
मंगरूळपीर तालुक्यात बहुतांशी शेतकरी हा कोरडवाहू शेती करतो, बागायतीची सोय नसल्यामुळे या भागातील शेतकरी बारमाही पिक घेवू शकत नाही. एकाच पिकांवर शेतकऱ्याला अवलंबून राहावे लागते. अशातच नैसर्गीक संकटाचा सामना त्याला दरवर्षी करावा लागतो. यावर्षी झालेला अत्यल्प पाऊस, त्यातच मागील वर्षाचे शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेले कर्जामुळे आधीच आर्थीक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यासमोर बोंडअळीचे संकट उभे राहीले आहे. या बोंडअळीमुळे अनेक शेतकऱ्यांनी अक्षरश: कपाशी उपटून टाकली. कपाशी लागवड, त्यावर आतापर्यंत झालेला खर्चसुध्दा निघत नसल्याचे चित्र सध्या आहे. त्यामुळे यावर्षी मंगरूळपीर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. या बोंडअळीमुळे हजारो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेती तज्ञांनी व्यक्त केला आहे.
सुमारे 60 टक्के कपाशीचे पिक नष्ट झाले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या करन्याची वेळ येवू नये यासाठी शासनाने पावले ऊचलावी हिच शेतकर्यांमधून अपेक्षा केली जात आहे.
फुलचंद भगत
सहसंपादक,सम्राट टाईम्स लाईव्ह
मो.9763007835
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा