रविवार, १७ डिसेंबर, २०१७

माजी प्राचार्य दत्तात्रय उलेमाले यांचे निधन


वाशीम - माजी नगराध्यक्षा लताताई उलेमाले यांचे पती तथा समाजसेवी पंकज व नितीन उलेमाले यांचे वडील माजी प्राचार्य व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त दत्तात्रय बळीरामजी उलेमाले यांचे आज, 17 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 71 वर्षे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. अत्यंविधीचा कार्यक्रम सोमवार, 18 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पद्मतिर्थ येथे होणार आहे. स्व. दत्तात्रय उलेमाले हे समाजसेवक व आदर्श शिक्षक म्हणून सर्वत्र परिचित होते. सोबतच नितीन व पंकज ही त्यांची दोन्ही मुले सामाजीक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांच्या निधनाने शहरात शोककळा पसरली असून दु:ख व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा