आमदार राजेंद्र पाटणी वर गुन्हे दाखल होतील का?
प्रकरण बीजेपी सरकार दडपणार?
सम्राट टाइम्स न्यूज
या देशात लोकशाही आहे हुकूमशाही नव्हे .कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही . वाशिम जिल्ह्यात कायदा सत्तेच्या गुर्मीत असणाऱ्या गर्भश्रीमंतांच्या बाजूला असल्याचे 25/15 च्या कमिशन प्रकरणावरून दिसून येत आहे .चक्क मुख्यमंत्र्याच्या नावाने कमिशनपोटी 10 लक्ष रूपये घेणारा आमदार राजेंद्र पाटणी मुख्यमंत्र्याच्या खास मर्जीतील असल्याने पोलिसांना गुन्हा दाखल करताना मुख्यमंत्र्याची परवानगी घ्यावी लागणार आहे का? कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मॅडमनी योग्य ती भूमिका घेऊन मस्तावालांचा बिमोड करण्याची गरज निर्माण झाली आहे. लेडी सिंघम म्हणून महाराष्ट्रात परिचिती असणाऱ्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील योग्य न्याय देतील असा विश्वास पीडित समाजसेवक महादेवराव ताटके यांनी सम्राट टाइम्स शी बोलताना व्यक्त केला .25/15 शासन निधी प्रकरणावरून कमिशनखोर वृत्तीचा पर्दाफाश झाला आहे . देशात शासनाच्या विविध योजनेतुन विकास कामे केली जातात . शिफारस करणारे आमदार, खासदार ,मंत्री त्यांचे चेले चपाटे 10 ते 20 टक्के कमिशन घेऊन गबर बनले आहेत. गावागावात कमिशनच्या नावाखाली जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्य कार्यकर्त्यांनी अफाट माया गोळा केली असल्याची चर्चा आहे. 25-15 निधी प्रकरणाने शासन निधी ची लक्तरे वेशीला टांगल्या गेली आहेत .मंगरूळपीर येथील सामाजिक कार्यकर्ते महादेवराव ताटके यांनी अनेक अभिनव सामाजिक उपक्रम राबविले आहेत. गोरगरिबांना मदत करणारा दाता म्हणून जिल्ह्याला परिचित आहेत .पदरमोड करून ते समाजाला मदतीचा हात देतात. तेच हात कलम करण्याचा डाव आमदार राजेंद्र पाटणी यांनी आखला आहे. प्रसिद्ध समाजसेवक महादेवराव ताटके यांच्याशी आमदार पाटणी यांनी जवळीक साधली. 25/15 शासन निधीतून 1 कोटी रुपयांचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखविले .त्यासाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 10 लक्ष रुपये कमिशन देण्याच्या नावाखाली रक्कम कोणाच्या खिशात घातली? खरच त्यांनी मुख्यमंत्र्यांना 10 लक्ष रुपये कमिशन दिले का? हा संशोधनाचा विषय आहे. राजेंद्र पाटणी हा पैसे आणि राजकारणासाठी वाटेल ते करणारा गुंडप्रवृत्तीचा माणूस असल्याचा आरोप ताटके यांनी केला आहे .राजेंद्र पाटणी यांनी 25/15 चे काम मिळवून देण्यासाठी ताटके यांना मुंबई येथे मंत्रालयात बोलाविले तेथे आमदार लखन मलिक यांच्या नावाने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला .लखन मलिक कामात खोडा घालत असल्याने त्यांच्या मतदार संघात मी ढवळा ढवळ करणार नसल्याचे सांगितले. ताटके यांनी काम फुकट नव्हे तर कामासाठी 10 लक्ष रुपये दिलेत असे म्हणताच राजेंद्र पाटणी यांचा पारा चढला त्यांनी ताटके यांना जीवे मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली.
ताटके यांनी आमदार पाटणी यांना 10 लक्ष रुपये परत करण्याची मागणी केली .आमदार पाटणी ने ताटके यांना 10 लक्ष परत केलेच नाहीत उलट मानसिक आणि शारीरिक त्रास त्रास दिला .वेळोवेळी पैसे घेण्यासाठी ठिकठिकाणी बोलवून झुलवत ठेवले .एका प्रसिद्ध समाज सेवकाला दलित म्हणून हिनवले .अशा जातीवादी राजेंद्र पाटणी यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी पोलीस मुहूर्त पाहणार आहेत का? थेट मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकरणात हस्तक्षेप तर केला नाही ना?असे अनेक तर्क वितर्क लावल्या जात आहेत .राजेंद्र पाटणी यांच्या विरोधात ताटके यांनी पोलीस तक्रार केल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे .राजेंद्र पाटणी यांच्यावर कार्यवाही होण्यासाठी आंदोलन पेटविने गरजेचे आहे. अन्यथा अशी गुंड प्रवृत्ती डोके वर काढत राहील .अशा वृत्तीचा बिमोड करणे काळाची गरज आहे .25-/15 निधी आता कोणते वळण घेते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे .
सम्राट टाइम्स न्यूज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा