शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

जाधव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची तलवारबाजी संघात निवड


वाशीम - स्थानिक श्री व्यंकटेश सेवा समिती व्दारा संचालीत श्री तुळशिरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालयाचा बी.ए. प्रथम वर्षाचा खेळाडू महेश नेतनसकर याची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या तलवारबाजी संघात निवड झाली. विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धा डॉ. बाबासाहेब महाविद्यालय अमरावती येथे नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये खेबर या क्रीडा प्रकारात महेशने विद्यापीठातून व्दितीय स्थान मिळविले. त्यामुळे त्याची विद्यापीठाच्या तलवारबाजी संघात निवड करण्यात आली. आगामी अमृतसर पंजाब मधील गुरुनानक देव विद्यापीठात 17 ते 19 जानेवारी 2018 दरम्यान आयोजीत आंतरविद्यापीठ  स्पर्धेत महेश विद्यापीठाचे नेतृत्व करणार आहे. तसेच याच तलवारबाजी संघामध्ये महाविद्यालयाचे खेळाडू आकाश गायकवाड व हरिष धोंगडे यांची सुध्दा राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. विजयराव जाधव व प्राचार्य डॉ. एम.के. गावंडे यांनी कलरकोट धारक खेळाडू महेश नेतनसकर व राखीव खेळाडू आकाश गायकवाड आणि हरिष धोंडे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सर्व खेळाडूंना शारीरीक शिक्षण संचालक प्रा. बाळासाहेब पौळ व प्रशिक्षक संदेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा