शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

व्यसनमुक्ती कार्यात सहभागाबद्दल संदीप पिंपळकर यांचा सन्मान



वाशीम - महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती वाशीम तर्फे आयोजीत 15 ते 31 डिसेंबर मद्यपान विरोधी पंधरवड्यामध्ये शनिवार, 23 डिसेंबर रोजी आयोजीत व्यसनमुक्ती कार्यक्रमात सक्रीय सहभागाबद्दल येथील साप्ताहिक पहाटवाराचे संपादक व शासनाचे अधिस्विकृतीधारक पत्रकार संदीप पिंपळकर यांना महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष पी.एस. खंदारे, प्रधान सचिव प्रा.उन्मेष घुगे व नागार्जुन संस्था वाशीमच्या अध्यक्ष कुसुमताई सोनुने यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला. पिंपळकर यांनी याआधी शासनाच्या पुरवठा विभागाच्या शहर दक्षता समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून तीन वर्षे प्रभावीपणे कार्य केले आहे. तसेच आदित्य न्युज नेटवर्कच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. धार्मिक कार्यात सहभागाबद्दल महाराष्ट्र गोंधळी समाज विकास मंडळ जिल्हा शाखेच्या वतीनेही त्यांचा सन्मान करण्यात आला होता. याशिवाय बेटी बचाव बेटी पढाव या शासनाच्या उपक्रमाची वैयक्तीक व सार्वजनिक जीवनात प्रत्यक्षपणे अंमलबजावणी केल्याबद्दल तरुण क्रांती मंचच्या वतीने आयोजीत कायर्र्क्रमात राज्याचे गृहराज्यमंत्री ना. रणजीत पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा