विविधस्तरीय जिल्हा दक्षता समितीमध्ये अशासकीय सदस्यपदी नियुक्ती
वाशीम - येथील समाजसेवक लॉ. वसंतराव धाडवे यांची पुरवठा विभागाच्या समितीत वर्णी लागली असून पुरवठा विभागाशी संंबंधीत असलेल्या वाशीम विविधस्तरीय जिल्हा दक्षता समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून शासनाच्या वतीने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय नेते व प्रादेशिक नेते यांच्या शिफारसीवरुन अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. गिरीष बापट यांनी लॉ. धाडवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यासंदर्भातील भाजपचे प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांचे पत्र नुकतेच धाडवे यांना प्राप्त झाले असून जिल्हास्तरीय अशासकीय समितीवरील रिक्त असलेल्या अनुसुचित जाती प्रतिनिधी पदावर त्यांची नियुक्ती केली असल्याचे पत्रात नमूद केले आहे. लॉ. धाडवे यांनी समाजसेवेत भरीव असे कार्य केले असून त्यांच्या कार्याची विविध संघटना, पक्ष आदींनी दखल घेवून त्यांना विविध पदे व पुरस्कारांनी गौरविले आहे. लॉ. धाडवे यांनी यापुर्वी भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. तसेच त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांची यापुर्वीच भाजपा राष्ट्रीय कार्यकारणीच्या अनुसुचित जनजाती मोर्चाच्या सदस्यपदी नियुक्ती केली होती. तसेच ते राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजीक कार्याची दखल म्हणून त्यांना विविध सामाजीक संघटनांनी पुरस्कार देवून सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजीक न्याय विभागाचा राज्यस्तरीय संत रोहिदास समाजगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांचा वाशीम व परभणी जिल्हयातील अनेक सामाजीक व शैक्षणिक संस्थेची निकटचा संबंध असून अनेक सामाजीक व शैक्षणिक उपक्रम ते राबवित असतात. त्यांच्या या सामाजीक कार्याची दखल घेवून केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर यापुर्वीच दादरा नगर हवेली या प्रदेशाचे प्रभारी म्हणून नेमणूक केली आहे. दक्षता समिती वरील आपल्या नियुक्तीबाबत धाडवे यांनी भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वासह प्रदेश नेते तथा अन्न पुरवठा नागरी मंत्री यांचे आभार मानले आहेत. या पदाच्या माध्यमातुन केंंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यत पोहचवून त्यांना याचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशिल राहू असे मत यावेळी धाडवे यांनी व्यक्त केले. धाडवे यांच्या निवडीबद्दल भाजपा प्रदेश कार्यालय तथा स्थानिक भाजपा नेते व मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा