मंगरुळपीर-तर्हाळा येथील बाबाजान दर्गाह येथुन शेलुबाजारकडे येणार्या शाहबाज खान वय-५५ यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते दोघे भाऊ जागीच ठार झाल्याची घटना दि.२२ च्या दुपारी १२-३० वाजताच्या दरम्यान घडली.
पोलिसांकडुन मिळालेल्या माहीतीनूसार नागपुर औरंगाबाद दृतगती मार्गावरील नागी फाट्यानजीक तर्हाळा येथील जगप्रसिध्द बाबाजान दर्गाह येथे स्वयंपाकी म्हनून सेवा देणारे शाहबाज खान व त्यांचा काश्मीर येथील भाऊ समरोज हे दोघेजण दुचाकी क्र.एम एम ०४- सि क्यु ८३३१ ने तर्हाळा येथुन शेलुबाजारकडे येत असतांना अज्ञात वाहनाचे धडकेने जागीच ठार झाले.या दुर्दैवी घटनेमुळे सर्वञ हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
सम्राट टाईम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा