स्वच्छतेतुन गाव हागणदारी मुक्त आणी नंदनवन करण्या साठी युवकांनी पुढाकार घ्यावा-फुलचंद भगत
निरोगी आणी समृध्द जीवनासाठी शौचालयाचा वापर करन्याचे आवाहन
मंगरुळपीर:-स्वच्छ भारत मिशनला यशस्वी करुन गावाचे नंदनवन करन्यासाठी व गाव हागनदरीमुक्त करन्यासाठी फुलचंद भगत यांनी युवकांना आवाहन केले असुन गावविकास आणी गावसमृध्दीसाठी एकजुट होवु काम करा असा संदेश दिला आहे.
समाजात स्वच्छतेला पुर्वापार महत्व आहे. आपले जीवन निरोगी व समृध्द होण्यासाठी शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करून आपल्या गावात शौचालय बांधकामा साठी युवकांनी पुढाकार घेवून गाव हागणदारी मुक्त करावे असे आवाहन पत्रकार फुलचंद भगत यांनी केले.
मंगरुळपीर तालुक्यातील गावे हागंदारी मुक्त करण्या साठी घरोघरी जाऊन शौचालयाचे महत्व सांगून स्वच्छतेचा जागर करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. आपल्या गावात घरोघरी शौचालय बांधण्या साठी पुढाकार घेऊन गाव हागणदारीमुक्त करण्या साठी युवकांनी पुढाकार घ्यावा, तसेच गावातील शौचालय नसणार्या कुटुंबातील नागरिकांना शौचालय बांधकाम व नियमित वापर करण्या साठी नागरिकांनी, युवकांनी पुढाकार घेऊन गाव हागणदारी मुक्त करण्या साठी प्रयत्न करावे. गावात शौचालय बांधून गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सरपंच व ग्रामसेवक यांची असून तसेच या साठी गावातील नागरिकांनीही पुढाकार घेतला पाहिजे. गावातील वाढत्या आजारांचे प्रमाण कमी करावयाचे झाले तर स्वच्छते शिवाय पर्याय नाही. गावस्तरावर गावाचे प्रमुख म्हणून सरपंचांनी व ग्रामस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. स्वच्छतेच्या कामातूनच गावाचा लौकीक वाढेल. या साठी गावस्तरावरील सर्व समित्यांचे सदस्य, महिला बचतगट, युवक मंडळ, यांनीही स्वच्छते साठी वज्रमूठ करुन कामे केल्यास अल्पावधितच गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही.गावात शौचालय नसलेल्या कुटूंबापर्यंत पोहचून त्यांना शौचालय विषयी माहिती देण्यात आली . शौचालय बांधण्या साठी आग्रह केला. ज्या कुटूंबांकडे शौचालय आहे. मात्र शौचालयाचा वापर होत नाही.अशा कुटूंबाशी संवाद साधून त्यांना शौचालय वापर करण्यासंदर्भात प्रवृत्त करण्या साठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. आरोग्य व समृध्द जीवना साठी स्वच्छता महत्वाचा घटक आहे. यामुळे प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छते बरोबरच सार्वजनिक स्वच्छतेला महत्व द्यावे. यासाठी नावाने एकत्र येवून एकजुटीने काम करावे. यासाठी बाहेरील स्वच्छते प्रमाणे मनाचीही स्वच्छता करावी व गावाला आदर्श करावे असे आवाहन फुलचंद भगत यांनी केले आहे.
सम्राट टाईम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा