गाव समृध्दीसाठी ग्रामगीता अंगीकारणे आवश्यक - शिंदे ग्रामगीता पुस्तकाचे वाटप : सेवानिवृत्त शिक्षकाचा सत्कार सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क वाशीम - तालुक्यातील तांदळी शेवई येथील जिल्हा परिषद शाळेतून निवृत्त झालेले शिक्षक उत्तमराव शिवराम शिंदे यांचा सेवानिवृत्तीबद्दल क्षेत्रभेट पांडवउमरा येथे भव्य सत्काराचा कायर्र्क्रम घेण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक शिंदे यांनी सहकारी शिक्षक व गावकर्यांना ग्रामगीता पुस्तकाचे वाटप केले. हा कार्यक्रम गुरुवार, 21 डिसेंबर रोजी पांडवउमरा संस्थानात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता तुमडामे ह्या होत्या. तर मंचावर सत्कारमुर्ती उत्तमराव शिंदे, शिक्षक रामेश्वर बोपटे, रामराव चौधरी, संतोष चौधरी, अजाबराव भुसारी, किसन कांबळे, गणेश महाले, मनिषा कालापहाड, ज्ञानदेव सुरवाडे, संतोष देवळे, प्रशांत मोहळे, गजानन गायकवाड, विनायक भगत, बबनराव सुर्वे, जनार्धन पांचाळ, वंदना अंभोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिक्षक उत्तमराव शिंदे यांचा पुष्पगुच्छ, शाल व भेटवस्तू देवून भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक संतोष देवळे म्हणाले की, सेवानिवृत्त शिक्षक उत्तमराव शिंदे हे जि.प. यवतमाळ पं.स. पुसद येथे कार्यरत असतांना आपल्या सेवाकाळात त्यांनी परिवार नियोजनाचे राष्ट्रीय काम जोमाने केले. या कार्याची दखल घेवून जि.प. यवतमाळचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल अस्ताना यांनी त्यांचा गौरव केला होता. शैक्षणिक कार्यासोबतच राष्ट्रीय व सामाजीक कार्य सुध्दा केले. गावाजवळ श्री गजानन महाराजांचे मंदिर बांधुन सामाजीक नितीमूल्यांची जोपासना त्यांनी केली. 30 ते 35 जणांच्या एकत्र कुटंब पध्दतीत राहून त्यांनी इतरांनाही एकत्र कुटुंब पध्दतीची प्रेरणा दिली आहे. तसेच वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार अंगीकृत करुन त्यांनी प्रत्येक शिक्षकाला ग्रामगीता या पुस्तकाचे वाटप करुन शाळेला एक भेटवस्तू दिली. यावेळी मान्यवरांनी आपल्या विचारातून शिंदे यांच्या शिक्षकी कार्याचे कौतूक केले. आपल्या सत्काराला उत्तर देतांना उत्तमराव शिंदे म्हणाले की, सद्यस्थितीत संपूर्ण विश्वात अशांतता पसरलेली आहे. विज्ञानाच्या परमोच्च संशोधनामुळे मानव उन्नतीकडे जाण्याऐवजी विनाशाकडे वाटचाल करीत आहे. विज्ञानाची प्रगती दिसत आहे. परंतु माणसातील माणूसकी नष्ट होत आहे. मनावर होणारे अध्यात्मीक संस्काराचे र्हास होणे हे विज्ञानासाठी घातक ठरणार आहे. या विश्वात शांतता व समृध्दी आणावयाची झाल्यास गाव समृध्द होणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामगीता अंगीकारणे हा एकमेव उपाय आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष देवळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत मोहळे यांनी केले. सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
ग्रामगीता पुस्तकाचे वाटप : सेवानिवृत्त शिक्षकाचा सत्कार
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
वाशीम - तालुक्यातील तांदळी शेवई येथील जिल्हा परिषद शाळेतून निवृत्त झालेले शिक्षक उत्तमराव शिवराम शिंदे यांचा सेवानिवृत्तीबद्दल क्षेत्रभेट पांडवउमरा येथे भव्य सत्काराचा कायर्र्क्रम घेण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक शिंदे यांनी सहकारी शिक्षक व गावकर्यांना ग्रामगीता पुस्तकाचे वाटप केले. हा कार्यक्रम गुरुवार, 21 डिसेंबर रोजी पांडवउमरा संस्थानात घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता तुमडामे ह्या होत्या. तर मंचावर सत्कारमुर्ती उत्तमराव शिंदे, शिक्षक रामेश्वर बोपटे, रामराव चौधरी, संतोष चौधरी, अजाबराव भुसारी, किसन कांबळे, गणेश महाले, मनिषा कालापहाड, ज्ञानदेव सुरवाडे, संतोष देवळे, प्रशांत मोहळे, गजानन गायकवाड, विनायक भगत, बबनराव सुर्वे, जनार्धन पांचाळ, वंदना अंभोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिक्षक उत्तमराव शिंदे यांचा पुष्पगुच्छ, शाल व भेटवस्तू देवून भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक संतोष देवळे म्हणाले की, सेवानिवृत्त शिक्षक उत्तमराव शिंदे हे जि.प. यवतमाळ पं.स. पुसद येथे कार्यरत असतांना आपल्या सेवाकाळात त्यांनी परिवार नियोजनाचे राष्ट्रीय काम जोमाने केले. या कार्याची दखल घेवून जि.प. यवतमाळचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल अस्ताना यांनी त्यांचा गौरव केला होता. शैक्षणिक कार्यासोबतच राष्ट्रीय व सामाजीक कार्य सुध्दा केले. गावाजवळ श्री गजानन महाराजांचे मंदिर बांधुन सामाजीक नितीमूल्यांची जोपासना त्यांनी केली. 30 ते 35 जणांच्या एकत्र कुटंब पध्दतीत राहून त्यांनी इतरांनाही एकत्र कुटुंब पध्दतीची प्रेरणा दिली आहे. तसेच वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार अंगीकृत करुन त्यांनी प्रत्येक शिक्षकाला ग्रामगीता या पुस्तकाचे वाटप करुन शाळेला एक भेटवस्तू दिली. यावेळी मान्यवरांनी आपल्या विचारातून शिंदे यांच्या शिक्षकी कार्याचे कौतूक केले.
आपल्या सत्काराला उत्तर देतांना उत्तमराव शिंदे म्हणाले की, सद्यस्थितीत संपूर्ण विश्वात अशांतता पसरलेली आहे. विज्ञानाच्या परमोच्च संशोधनामुळे मानव उन्नतीकडे जाण्याऐवजी विनाशाकडे वाटचाल करीत आहे. विज्ञानाची प्रगती दिसत आहे. परंतु माणसातील माणूसकी नष्ट होत आहे. मनावर होणारे अध्यात्मीक संस्काराचे र्हास होणे हे विज्ञानासाठी घातक ठरणार आहे. या विश्वात शांतता व समृध्दी आणावयाची झाल्यास गाव समृध्द होणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामगीता अंगीकारणे हा एकमेव उपाय आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष देवळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत मोहळे यांनी केले.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा