सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
वाशिम येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व्यंकटेश उर्फ नाना पाठक यांचे बुधवारी (ता.20) रात्री 10 वाजता वृद्धपकानाले निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 88 वर्षाचे होते. व्यंकटेशन पाठक यांना ‘नाना’ म्हणून ओळखत होते. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अनेक जबाबदार्या पार पडल्या. व्यंकटेश पाठक हे विदर्भ पटवारी संघाचे 15 वर्ष राज्याध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाचे ते सदस्य सल्लागार होते.तसेच येथील टिळक स्मारक भवनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी अनेक वर्ष सांभाळली. राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी अनेकवर्ष सांभाळले. येथील स्माशानभूमिच्या सौदर्यीकरणासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. असे हे उमदे मनमिळावू व्यक्तीमत्व असलेले नाना पाठक यांचे 20 डिसेंबर रोजी निधन झाले. त्याच्यावर आज, 21 पद्मर्थी मुक्तीधाम येथील अत्यसंस्कार करण्यात आला. त्याच्या मागे दोन मुले दोन मुली असा मोठा आप्तपरिवार आहे.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा