शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

जिल्हा पोलीस दलातर्फे एम पासपोर्ट सुविधा कार्यान्वीत


👉👉 पासपोर्ट प्रक्रीयेत गतीमानता : सर्व पोलीस ठाणे प्रभारींना पुरविले टॅब

वाशीम - पोलीस आपल्या दारी ही शासन संकल्पना राबविण्याकरीता शासन निर्णयानुसार व पोलीस महासंचालकांच्या निर्देशानुसार जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एम पासपोर्ट सुविधा कार्यान्वीत करण्यात आली आहे. त्याअंतर्गत जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारींना उच्च तंत्रज्ञान असलेले टॅब पुरविण्यात आले आहेत.
    जिल्हा पोलीस अधिक्षकपदी मोक्षदा पाटील रुजु झाल्यापासुन त्यांनी अनेक लोकाभिमुख कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली. नागरीकांच्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडविण्यावर त्यांच्या कार्यशैलीचा भर असतो. पासपोर्ट प्रक्रियेसाठी व पडताळणीसाठी नागरीकांना माराव्या लागणार्‍या चकरा व किचकट प्रक्रियेमुळे लागणारा प्रदीर्घ कालावधी यामुळे नागरीकांना ही समस्या डोकेदुखी ठरते. त्यांची या समस्येपासून सुटका करण्यासाठी व लवकरात लवकर त्यांना पासपोर्ट मिळण्यासाठी एम पासपोर्ट सुविधा म्हणजे मोबाईलव्दारे पासपोर्ट पडताळणी ही ऑनलाईन सुविधा वाशीम पोलीस दलातर्फे पुरविण्यात येणार असल्याचे मोक्षदा पाटील यांनी याप्रसंगी सांगीतले सदर सुविधेअंतर्गत जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व खुफिया कर्मचार्‍यांना उच्च तंत्रज्ञान असलेला सॅमसंग कंपनीचा टॅब व आयडीया फोरजी नेटवर्क सिम 23 डिसेंबर रोजी पुरविण्यात आले आहेत. सदर सुविधा पुरविण्याबाबत पोेलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. नागरीक ज्या पोलीस स्टेशन हद्दीत राहतो तेथील तेथील पोलीस कर्मचारी टॅब घेवून त्या नागरीकांच्या घरी जावून जीपीएस सिस्टीम ऑन करुन संबंधीत व्यक्तीचा फोटो, सही व कागदपत्र पडताळणी करुन पुढील कार्यवाहीस जिल्हा विशेष शाखेचा अंतीम अहवाल दाखल होवून परस्पर पासपोर्ट कार्यालयाला ते प्रकरण ऑनलाईननेच दाखल होईल. जलद प्रक्रीयेमुळे नागरीकांना पासपोर्ट उपलब्ध होणार आहे. या एम पासपोर्ट सुविधेमुळे कामाचे एकसुत्रीकरण व पारदर्शकता येवून पोलीसांचा व नागरीकांना वेळ वाचून पेपरलेस वर्कचे शासनाचे धोरण साध्य होणार आहे. व प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे. सदर सुविधा नागरीकांना उपलब्ध करुन देण्यासाठी लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने वाशीम पोलीस दल प्रमुख मोक्षदा पाटील यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याबद्दल नागरीकांकडून त्यांच्या भूमिकेचे कौतूक होत आहे. सदर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी स्थागुशाचे पोलीस निरिक्षक प्रकाश डुकरे पाटील, जिल्हा विशेष शाखेचे पो.नि. श्रीराम घुगे, पोहवा. संदीप सरोदे व सायबर सेलचे पोलीस निरिक्षक रविंद्र देशमुख, पोलीस नाईक प्रदीप डाखोरे, पो.कॉ. अमोल काळमुंदळे, दिपक घुगे, प्रशांत चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा