रविवार, १७ डिसेंबर, २०१७

सकाळ चित्रकला स्पर्धेस मुंगळा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद सम्राट टाइम्स न्यूज


सम्राट टाइम्स न्यूज
दैनिक सकाळ वृत्तपत्राच्या वतीने   दि १७ डिसेंबरला विद्यार्थ्याच्या  कल्पनेच्या पंखाना  उंच भरारी देण्यासाठी महाराष्ट्रात एकाच वेळी शालेय  चित्रकला स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले . त्याअनुषंगाने दि १७ डिसेंबर रविवार रोजी मुंगळा येथील मोरेश्वर  विद्यालायत   दैनिक सकाळच्या वतीने शालेय चित्रकला स्पर्धा विनामूल्य   घेण्यात आली. मुंगळा येथील मोरेश्वर विद्यालय केंद्रावर   300 च्या वर विदयार्थी  विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मेडशी येथील 100 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभागी झाले . पुढील वर्षी मेडशी  येथे परीक्षा केंद्र ठेवण्याची मागणी काही शिक्षकांनी यावेळी केली . स्पर्धा चोख आणि  शांततेत पार पाडण्यासाठी मेडशी येथील बातमीदार अजय चोथमल ,मुंगळा येथील  बातमीदार राजेश कुटे, शिक्षक  मंगेश देशमुख, कैलास तहकिक, इंगळे ,देवढे  आणि  दैनिक सकाळ चे विजय घुगे ,अमोल जाधव  यांनी अथक परिश्रम घेतले 
सम्राट टाइम्स न्यूज


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा