रविवार, १७ डिसेंबर, २०१७

उकळी पेन येथे सकाळ बालमित्र चित्रकला स्पर्धा संपन्न




उकळी पेन :- येथे स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक वरिष्ठ केंद्रीय शाळे मध्ये सकाळ बालमित्र चित्रकला स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.
सदर चित्रकला स्पर्धेसाठी ऊकळी पेन , क्रुश्णा , सुकली येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेला एकूण 127 विद्यार्थी उपस्थित होते...ज्यात इयत्ता 1 ली ते इयत्ता 10 वी पर्यंत चे विद्यार्थी होते.

तसेच चित्रकला स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आमचे सम्राट टाईम्स प्रतिनिधि  तथा शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेशभाऊ इंगोले , शिक्षणतज्ञ कैलास कुटे , शिक्षक हातगुडे सर , विद्याप्रबोधिनी महाविद्यालय चे प्राचार्य संजय पेशकलवाड सर , प्रा. संदीप भगत सर ,समाजसेवक जीवन मह्ह्लले , माजी सरपंच कालीदास भोयनवाड , हनुमान विद्यालय कर्मचारी दत्ता सुरूदुशे सर , यांनी अथक परिश्रम घेतले.तसेच विशेष सहकार्य म्हणजे मुलांच्या बसण्याची व्यवस्था...अरविंद पंडित यांनी मोफत करुन दिली.त्यांनी त्यांच्याकंडील 10 चटाई अंगमेहनतीने आणून अंथरने , उचलने  इत्यादि परिश्रम घेतले...
सकाळ समूहाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालक वर्गामध्ये आनंदाचे वातवरण बघावयास मिळाले.

सम्राट टाईम्स 
सुरेशभाऊ इंगोले 
8830966982

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा