बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

मौजे चिखली येथे भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन


मंगरुळपीर-
परंमहंस श्री संत  झोलेबाबांच्या यात्रोत्सवा निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी
महाराज रचित भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे
आयोजन दि.३जानेवारी ते ५जानेवारी
२०१७पर्यंत करण्यात आले आहे.
प्रौढ विभागाच्या  भजन स्पर्धेच्या उदघाटन  कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी
माजी  राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांची
तर उदघाटक म्हणुन माजी राज्यमंत्री
गुलाबराव गावंडे व रिसोडचे आमदार
अमित झनक यांची उपस्थिती राहणार
आहे.
या  कार्यक्रमाला अ भा गुरुकुंज आश्रमचे
सचीव जनार्धन बोथे,सर्वाधिकारी प्रकाश  महाराज  वाघ,प्रचार प्रमुख दामोदर पाटील
लाॅ.वसंत धाडवे,अभियंता-नारायण बारड
दत्तात्रय भेराणे शेलुबाजार,
जिल्हासेवाधिकारी सुनिल सपकाळ,
जिल्हाप्रचारक साहेबराव पाटील,
जिल्हाभजन प्रमुख संजय क्षीरसागर
जिल्हासचीव डाॅ.सुधाकर क्षीरसागर
नामदेवराव बोथे अकोला,अरुण वाघ
नागपुर,अनिल पाटील राऊत,शिवदास
राउत,सुभाष शिंदे गोग्री,गंगाधर पाटील,
प्रकाश फाटे अकोला,जनसेवक जयस्वाल
महादेव सुर्वे लाठी,शालीकराम पाटील,
देवीदास राउत,अनिल गोठी शेलुबाजार,
मोहन राउत,साहेबराव राठोड,बाबाराव
चव्हाण शिवणी,ह.भ.वाघ चिखली,राम
राउत सोमठाणा,विलास लांभाडे,विजय
मनवर,रमेश पाटील शेगीकर यांची
उपस्थिती राहणार आहे.महिला विभागा
भजन  स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमा
प्रसंगी उदघाटक म्हणुन पं.स.च्या सभापती निलिमा देशमुख  तर अध्यक्षस्थानी माजी महीला  व बाल
कल्याण सभापती ज्योती गणेशपुरे
अॅड.कोमल हरणे,मेघा वाघमारे,प्रतिभा
महल्ले,साक्षी पवार कानशिवणी,आशा
ठाकरे यांची उपस्थिती राहणार आहे
भजन स्पध्येमध्ये विजेत्या भजनी
मंडळासाठी प्रौढ  विभागाकरिता प्रथम
बक्षीस १११११,असे अनुक्रमे-९१११,७१११,५१११,४१११,
३१११,२१११,११११,९११,८११,७११,
६११,५११,३११,राष्ट्रसंत तुकडोजी
महाराज  यांचा फोटो,बाल विभागा
करिता अनुक्रमे ७००१,५००१,४००१,
२५०१,११११,८११,५११,३०१अशी
तर महीला  विभागा करिता अनुक्रमे
७००१,५००१,४००१,३००१,२१०१,१५०१
१००१,८०१,५०१ अशा प्रकारची आकर्षक
बक्षीसे ठेवण्यात आली आहे.
या प्रसंगी अ.भा.श्री गुरुदेव सेवामंडळाचे
कार्यकर्ते नामदेव धानोरकर धानोरा,
गजानन खुळे बांबर्डा,तुकाराम राउत
अमरावती,महादेव वानखडे ईचा,अशोक
पळसकार बार्शीटाकळी,बाळकृष्ण रोकडे
वसंत गावंडे यांचा डाॅ.जनसेवक जयस्वाल यांचा माजी राज्यमंत्री सुभाष
ठाकरे यांचे  हस्ते सत्कार करण्यात
येणार आहे सर्व भजनी विजैत्या भजनी
मंडळांना श्री  झोलेबाबा संस्थान च्या
अध्यक्ष व विश्वस्थ मंडळिंच्या हस्ते
बक्षीस वितरण  करण्यात येईल.या
कार्यक्रमाला  गजानन  बाबा भजन
मंडळ  लाठी व सती आई भजन मंडळ
लाठी व गावकरी मंडळींचे सहकार्य  करणार आहेत तरी या भजन   स्पर्धेत भजनी मंडळांनी सहभाग घ्यावा  असे आवाहन स्पर्धेचे व्यवस्थापक सुधाकर भांडेकर यांनी केले आहे.

सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा