जिल्हा परिषद सदस्याला झणझणीत चपराक
वाशिम जिल्ह्यातील रिधोरा येथे ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्याला झणझणीत चपराक बसली असून उपसरपंचपदी भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष संदीप सावळे गटाच्या सौ मंगला महादेव शिंदे यांनी बाजी मारली .
रिधोरा गाव एका मंत्र्याचा कट्टर समर्थक समजल्या जाणारे तथा जिल्हा परिषद सदस्याचे गाव आहे. या जिल्हा परिषद सदस्याला मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व राखता आले नाही .9 सदस्य संख्या असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्यांचे केवळ 3 सदस्य निवडून आले .जिल्हा परिषद सदस्य गटाचा सरपंच थेट जनतेतून निवडून आला असला तरी त्यांचे विरोधक संदीप सावळे गटाचे 4 सदस्य निवडून आले तर 2 अपक्ष सदस्य निवडून आले. जिल्हा परिषद सदस्याने एक सदस्य पळविल्याने त्यांच्याकडे 4 सदस्य संख्या झाली .संदीप सावळे यांनी एक अपक्ष सदस्य ओढल्याने सावळे गटाकडे 5 सदस्य संख्या झाली. रिधोरा येथे आज उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी जिल्हा परिषद सदस्य गटाकडून गणेश उत्तम हजारे यानी तर सावळे गटाकडून सौ मंदा महादेव शिंदे यांनी अर्ज दाखल केला.पराभव समोर दिसताच जिल्हा परिषद सदस्य गटाच्या हजारे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सौ मंदा शिंदे विजयी झाल्या. उपसरपंचपदी सौ शिंदे यांची निवड होताच रिधोऱ्यात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली .गावातून सौ शिंदे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली . सावळे गटाने जिल्हा परिषद सदस्यांच्या हुकूमशाहीला सुरुंग लावला एवढे मात्र निश्चित!
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा