कामरगाव - येथील कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने ग्रामपंचायत सर्वेक्षनाच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. उध्दव जाने. यांच्या मार्गदर्शनात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या माध्यमातून विध्याथ्यांना ग्रामपंचायत संदर्भात माहिती व्हावी विशेषता ग्रामपंचायतींमधे महिलांचा सहभाग किती प्रमाणात वाडला याचा शोध घेण्याच्या दृस्टिकोनातून कारंजा तालूक्यातिल निवडक ग्रामपंचायतिच्या सरपंच पदाचा मागील 20 वर्षाच्या सर्वेक्षनाच्या मध्यमातून आडावा घेण्यात आला. त्यामधे असे प्रदर्शनास आले की केवळ महिलांन करीता राखीव असलेल्या सरपंच पदावरच त्यांना संधी देण्यात आली. सर्वसाधारण खुल्या असलेल्या सरपंच पदाकरीता कधीही महिलाना संधी दिली गेली नही.
तसेच या सर्वेक्षनातून एक बाब प्रकर्षाने समोर आली. ते म्हणजे महिला सरपंच असलेल्या गावचा , ग्रामपंचायतच्या प्रत्यक्ष व्यवहारात राजकारभार काही अपवाद सोडले तर पुरुष वर्गाकडूनच चालवला जातो. ग्रामपंचायतीचे वास्तव विध्याथ्यांना समजण्याकरिता राज्यशास्त्र विभाग प्रमुख, प्रा. डॉ . गजानन हिवाराळे. यांनी पुढाकार घेऊन विध्याथ्यांना प्रोत्साहित केले . त्यामुळे विध्याथ्यांना ग्रामपंचायतचे , सरपंच पदांचे कृतीशीलतेतून ज्ञान तथा माहिती मिळण्यास मदत झालि . राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने सामाजिक जान, भान ठेवून नेहमीच विध्याथ्यांना क्षानात भर पाडण्याकरीता उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग मनुन प्रस्तुत उपक्रम राबविल्या बद्दल
राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या सर्व विध्याथ्यांचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.
विशाल ठाकरे.
8975734338,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा