मुलाच्या नोकरीसाठी मातेचे आमरण उपोषण सुरू
रिसोड बाजार समितीचा 11 वर्षांपासून अन्याय
वाशिम जिल्ह्यातील रिसोड कृषि उत्पन्न बाजार समितीत हुकूमशाही सुरू आहे. मुलाला नोकरीवर ठेवून पुन्हा कमी करणाऱ्या बाजार समितीला कायद्याचा धाक राहिला नाही. रिसोड येथील प्रमिला शेवाळे यांच्या पतीला बाजार समिती प्रशासनाने नोकरी वरून कमी केले .प्रमिला यांनी मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरीवर घेण्यासाठी 11 वर्षांपासून संघर्ष चालविला आहे .अखेर न्याय मिळण्यासाठी त्या मातेने कडाक्याच्या थंडीत मुलासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे .
रिसोड येथील प्रमिला शेवाळे यांच्या पतीचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांना नोकरी गमवावी लागली .मुलाबाळावर उपासमारीची पाळी आली. उदर निर्वाहासाठी दुसरे साधन नसल्याने प्रमिला यांनी अनुकंपा तत्ववर नौकरी मिळण्यासाठी 2006 मध्ये बाजार समिती प्रशासनाकडे विनंती अर्ज केले मात्र प्रशासनाला पाझर फुटला नाही. बाजार समिती प्रशासनाने दि 19 जानेवारी 2015 मध्ये त्यांचा मुलगा स्वप्नील याला सेवेत घेतले .दि 5 मार्च 2015 ला बाजार समिती प्रशासनाने स्वप्नीलला तडकाफडकी कामावरून कमी केले . स्वप्नील पदवीधर आहे . टंकलेखन , संगणक प्रशिक्षित असूनही त्याला हेतुपुरस्कार डावलण्यात आले . बाजार समिती प्रशासनाच्या खास मर्जीतील उमेदवारांना नोकरी देण्यात आल्याचा आरोप प्रमिला शेवाळे यांनी केला आहे.11 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रमिला शेवाळे यांनी न्याय मिळण्यासाठी मुलासह जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा