रविवार, २४ डिसेंबर, २०१७

मनभा उपसरपंच पदी तायडे विजयी



  कारंजा तालुक्यातील मौजे मनभा   ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी निवडणूक होऊन धनंजय वामनराव तायडे हे विजयी झाले निवडून प्रक्रिया नवनिर्वाचित सरपंच 
  मिर्झा वहिदबेग सत्तारबेग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली  .निवडणूक अध्यास्ती अधिकारी म्हणून  कुलकर्णी , निरीक्षक  गवई  ग्रामसेवक अधिकारी एस. आर .साखरे  आदींनी काम पाहले.  आज सकाळी १०.०० ते १२.०० वाजपर्यंत उपसरपंच  पदाकरिता   धनंजय वामनराव तायडे  व दिलीप  वामनराव बोलके  असे दोन अर्ज  भरण्यात आले . छाननिमध्ये सुद्धा दोन अर्ज कायम राहिले . निवडणूक अधिकारी यांनी दुपारी २.०० वाजता अकरा  सदस्यांचे आवाजी मतदान घेतले   त्यामध्ये धनंजय वामनराव तायडे यांना आठ मते पडली. तर दिलीप वामनराव बोलके यांना तीन मते पडली ,  निवडणूक अधिकारी कुलकर्णी  यांनी धनंजय वामनराव तायडे याना उपसरपंच पदासाठी विजयी घोषित केले.   नवनिर्वाचित सरपंच मा. मिर्झा वाहिदबे व उपस्थित सद्स्य यांनी उपसरपंच यांचे अभिनंदन केले   एस.डी. जाधव जमादार . एस.डी. इंगळे पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला . निवडणूक शांततेने पार पडली.     
            कारंजा प्रतिनिधी - दामोदर जोंधळेकर 
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा