रविवार, २४ डिसेंबर, २०१७

फुले जयंती निमित्त स्पर्धा परीक्षेस विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद


पाचशे विद्यार्थ्यांचा सहभाग : सामाजीक संघटनांचे संयुक्त आयोजन
वाशीम - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त माळी कर्मचारी सेवा मंडळ, अ. भा. माळी महासंघ, माळी युवा मंच व सावित्री महिला मंच यांच्या वतीने स्थानिक बाकलीवाल विद्यालयात 24 डिसेंबर रोजी आयोजीत सामान्य स्पर्धेत शहरातील विविध विद्यालयाच्या तब्बल पाचशे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. 
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरोगतज्ञ डॉ. विजय कानडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे प्राचार्य बिल्लारी सर, न. प. शिक्षण सभापती सौ. कंचनताई उमेश मोहळे, शिवसेना गटनेत्या सौ. आशाताई मडके, सौ. रेखाताई राऊत, सौ. सविताताई मोहळे, सौ. पुजाताई उलेमाले जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, उमेश मोहळे, संचालक केशव खासभागे हे होते.
    सर्वप्रथम मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर डॉ. कानडे यांनी मुलांना स्पर्धा परिक्षेचे महत्व सांगितले. तर प्राचार्य बिल्लारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्या नंतर गट 5 ते 8 व गट 9 ते 12 यांची स्पर्धा परीक्षा शिस्तबद्ध पद्धतीने घेण्यात आली. परिक्षक म्हणून कैलाश वानखेडे, प्रशांत मोहळे, योगेश उलेमाले, संदीप भांदुर्गे, नागुलकर सर, संभाजी साळसुंदर, गजानन राऊत, राजू खोटे, महेश राऊत, रूपेश भोसले, प्रवीण उलेमाले, रवि ठेंगडे, गणेश जेठे आदींनी काम पाहीले. ही परीक्षा फुले दाम्पत्य, छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, डॉ. आंबेडकर, शाहू महाराज, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज आदी महापुरुषांच्या जीवन चरित्रावर आधारित होती. स्पर्धा परिक्षेचे महत्व कळावे हा यामागचा उद्देश होता. परिक्षेकरिता आरटीओ मडके यांनी लेखन साहित्य, संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्र बाकलीवाल यांनी शाळा उपलब्ध करून दिली. खाऊ, चहा, आसन व्यवस्था अ. भा. माळी महासंघ जिल्हाध्यक्ष गजानन ठेंगडे, पेपर बॅनर समाधान गिर्‍हे, गणेश मोहळे यांनी छपाई करुन दिले. यावेळी सुनील जाधव, प्रशांत भडके, उद्धव कष्टे, विनोद राजगुरु, बभ्रुवाहन वैद्य, नंदू जहीरव, सिद्धार्थ वानखेडे, सत्यशोधक अध्यक्ष गजानन धामणे, महादेव हरकळ, वैभव कडवे, हनुमान काळे, अमोल काळे, दाभाडे मामा हे होते. संचलन नारायण ठेंगडे यांनी, प्रास्तविक माळी युवा मंच जिल्हाध्यक्ष नागेश काळे यांनी तसेच आभार अ. भा. माळी महासंघाच्या  राज्य संघटीका तथा सावित्री महिला मंचच्या जिल्हाध्यक्षा सौ. किरण ताई गिर्‍हे यांनी मानले.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा