रविवार, २४ डिसेंबर, २०१७

अकोला-हैद्राबाद महामार्गावर पातूर घाटात मोटरसायकल स्वार जागीच ठार


अकोला-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर पातूर घाटात मोटारसायकल ला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मेडशी येथील मोटारसायकल स्वार रमेश अंकुश चव्हाण वय 45 वर्ष जागीच ठार झाल्याची घटना दि 24 डिसेंबरला रात्री 9 वाजता घडली.
शेगाव येथे पंचायत समितीत नोकरीवर असलेले रमेश अंकुश चव्हाण वय वर्षे 45 हे मोटारसायकल क्रमांक एम एच 37 के 9635 ने शेगाव येथून मेडशी येथे येत असताना अकोला -हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर पातूर घाटात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला . घटनेची माहिती  मिळताच पातूर पोलीस घटना स्थळी दाखल झाले . प्रेत शवविच्छेदनासाठी अकोला येथे पाठविण्यात आले .पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा