बुधवार, २० डिसेंबर, २०१७

महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची अकोला तालुका महिला कार्यकारिणी जाहीर



अकोला-महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशचे संस्थापक अध्यक्ष श्री. रवि वैद्य यांच्या आदेशानुसार   विदर्भ उपाध्यक्ष श्री. अजय जमुनाह ठाकूर आणि अकोला जिल्हाध्यक्ष श्री. निलेश किरतकार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड. रुपालीताई राऊत यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. 
   यामध्ये अकोला अध्यक्ष पदी  सौ. अलका संजय कांबळे , उपाध्यक्ष कु. स्वीटी केवट, सचिव कु. सोनु वानखडे,  सरचिटणीस कु. स्वाती इंगोले,  संघटक कु. आकांक्षा राऊत   तर तालुका संपर्क  प्रमुख म्हणुन कु. रिना शेगावकर यांना नियुक्ती पत्र देऊन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. 
    महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या शाखा संपुर्ण राज्यभर पसरल्या आहेत. या संघटनेमुळे पोलिसांच्या पाल्यांना पोलीस भरती मध्ये ५ % आरक्षण मिळाले आहे. महाराष्ट्र पोलीस दलात कार्य करणारे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी संघटना विविध उपक्रम राबवत असते. 

   नियुक्त्या झालेल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी समस्त पोलीस बॉईज असोसिएशनचे आभार मानले. या पुढे आपण सतत पोलीस आणि त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी काम करू, असे महिला पदाधिकारी म्हणाल्या. 

  यावेळी विदर्भ उपाध्यक्ष श्री. अजय जमुनाह ठाकूर , अकोला जिल्हा अध्यक्ष श्री. निलेश किरतकार , जिल्हा उपाध्यक्ष श्री. महेश गावंडे , सचिव श्री. संदिप सोनोने , अकोट तालुकाध्यक्ष श्री. अनिल वगारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अँड. रुपालीताई राऊत , उपाध्यक्षा कु. शारदाताई वाळके , सचिव कु. जयाताई बेलूरकर , सरचिटणीस कु. शुभांगी ढेमे, तर महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क प्रमुख सौ. रेखाताई जोतवाणी उपस्थित होत्या.

    यावेळी विदर्भ उपाध्यक्ष श्री. अजय जमुनाह ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष श्री.  निलेश किरतकार यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

फुलचंद भगत
मो.9763007835
सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा