👉 लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
सम्राट टाइम्स न्यूज
मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील वरली मटक्यावर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथकाने छापा घालत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कार्यवाही आज सायंकाळ च्या सुमारास केली सदर कार्यवाहिने अवैध धंदे करणारांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे .
लेडी सिंघम पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी जिल्ह्यातील सर्वच अवैद्य बंद केले मात्र काही महिन्यांपासून अवैद्य धंद्यानी डोके वर काढले. हळूहळू जिल्ह्यात अवैध धंदे सैराट होत असतानाच पोलीस अधीक्षकांच्या विशेष पोलीस पथकाने जऊळका रेल्वे येथे 4 दिवसापूर्वी सुरू झालेल्या वरली मटक्यावर धाड टाकली .कार्यवाहीत 10 मोटारसायकल 5 मोबाईल्स ,रोख रक्कम, वरली मटका साहित्यसह लाखो रुपयांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . 11 लोकांवर कार्यवाही करण्यात आल्याचे जुगार अक्ट प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया उशिरा रात्री सुरू होती
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली
सम्राट टाइम्स न्यूज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा