सामाजीक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांचा पुढाकार
वाशीम - शहरातील सर्वात प्राचीन व चौदाशे वर्ष पुरातन असलेल्या स्थानिक गोंदेश्वर येथील जुना बालाजी गोविंदराज स्वामी मंदिराच्या जिर्णोध्दार कार्यास सामाजीक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांच्या पुढाकाराने प्रारंभ झाला आहे. वाशीम हे ऐतिहासिक नगर असून याठिकाणी सर्वात प्राचीन असलेल्या गोेंदेश्वर येथील बालाजी मंदिराच्या विकासाकडे कुणाचेही लक्ष नव्हते. या मंदिरात भव्य तिरुपती बालाजी सारखी प्रतिमा असून सोबतच भगवान विष्णू शेषनागावर झोपलेले असलेली नयनरम्य मुर्ती येथे आहे. सोबतच राम, लक्ष्मण, सिता यांच्याही भव्य मुर्त्या असून रतनदास तुलसीदास बैरागी, रामप्रसाद रतनदास बैरागी व बैरागी परिवार हे या मंदिराची पुजाअर्चना व देखरेख करीत आहेत. सदर मंदिर हे वाशीमचे वैभव असून या अतिप्राचीन मंदिराचा जिर्णोध्दार करण्याचा निर्णय सोमाणी यांनी घेतल्यानंतर बालाजी कंस्ट्रक्शन कंपनीचे संचालक रुपेश बाहेती, आयुर्वेद तज्ञ डॉ. दीपक ढोके, सामाजीक कार्यकर्ते गजानन अग्रवाल आदींनी या कार्याला सर्वप्रथम हातभार लावून जिर्णोध्दार कार्यास प्रारंभ केला आहे. मंदिराचे सुशोभीकरण करण्यात येत असून आतमध्ये आकर्षक टाईल्स व स्टिल रोलींग करण्यात आले. सदर कार्याकरीता नगरसेवक राजुभाऊ भांदुर्गे, शिवसेना शहर प्रमुख गजानन भांदुर्गे यांचेही विशेष सहकार्य मिळत आहे. सोबतच मंदिरामध्ये जिर्णोध्दार कार्यात कमल पेन्ट हाऊसचे संचालक श्रीराम राठी व संग्राम राठी, मारवाडी युवा मंचचे प्रांतीय उपाध्यक्ष शैलेश सोमाणी, सामाजीक कार्यकर्ते अनंता रंगभाळ, समीर मोकासदार, श्रेया मोमेंटोचे संचालक संदेश बांडे यांनीही या कार्याला हातभार लावण्याचा निर्णय घेवून सहकार्य केले आहे. दर शुक्रवारी मंदिरामध्ये पुजाअर्चना, दुधाचा अभिषेक करण्यात येणार आहे. सदर मंदिराच्या जिर्णेाध्दाराच्या कार्यास सर्वानी हातभार लावून सहकार्य करण्याचे आवाहन बैरागी परिवार व समन्वयक निलेश सोमाणी यांनी केले आहे.
सम्राट टाईम्स
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा