11 वर्षांपासून पासून बाजार समितीने चालविला अन्याय
सम्राट टाइम्स न्यूज
रिसोड :मागील अकरा वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रमिला विजय शेवाळे या महिलेने दि 27 डिसेंबरला वाशिम उपनिबंधकाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे रिसोड कृषी
उत्पन्न बाजार समिती रिसोड येथे प्रमिला शेवाळे यांचे पती सेवेत होते त्यांची मानसिकस्थिती ठीक नसल्यामुळेत्यांना मध्येच नोकरी सोडावी लागली त्यामुळे कुटूंबाची आर्थिक स्थिती कोलमडली खूप काबाडकष्ट करून मुलांचं शिक्षण व संगोपन केलं.मुलाला अनुकंपतत्वावर सेवेत घेण्यासाठी अकरावर्षांपूर्वी म्हणजे २००६ साली बाजार समितीकडे विनंती केली होती
परंतु बाजार समितीने शब्द देऊनही मुलाला सेवेत घेतले नाही.माझा विनंती अर्ज असतानाही आर्थिक व्यवहार करून बोगस नोकरभरती केल्याचा आरोप शेवाळे यांच्याकडून करण्यात आला आहे.बाजार समितीचे संचालक मंडळ सातत्याने करीत असलेल्या चालढकल ,हेळसांड व अन्याय याला कंटाळून मुलाला कायम सेवेत घेतल्या जात नाही तोपर्यंत दि २७डिसेंबर पासून जिल्हा उपनिबंधक कार्यालय वाशिम येथे आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे पत्र प्रमिला शेवाळे यांनी दीड महिन्यांपूर्वी संबंधित विभागाला दिले आहे.
प्रमिला शेवाळे यांचा मुलगा स्वप्नील याने सतरा महिने रोजंदारी तत्वावर काम केले परंतू समितीला आवश्यकता नसल्याचा कारणावरून त्याला कामावरून कमी करण्यात आले. सभापती व सचिव यांच्याकडून स्वप्नीलला कायम करून घेण्याच्या भूलथापा देण्यात आल्या.बाजार समितीमध्ये झालेला पद भरतीतील भ्रष्ट्राचाराची चौकशी करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे.
सम्राट टाइम्स न्यूज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा