शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून किरणकुमार साळवे रुजू



वाशिम जिल्ह्यातील जऊळका पोलीस स्टेशन चा पूर्व इतिहास तपासता ठाणेदाराची खुर्ची शापीत असल्याचा प्रत्येय वेळोवेळी आला  आहे . जऊळका ठाण्याचा  अलीकडचा इतिहास पाहता  ठाणेदारावर  कोणत्या ना कोणत्या कारणाने गंडांतर आली आहेत . ठाणेदार आर जी  शेख यांना जऊळका ठाणेदार म्हणून  जेमतेम 2 वर्ष झाली नाहीत तोच त्यांची बदली करण्यात आली  .त्यांच्या जागेवर  एलसीबी चे सहाय्यक निरीक्षक किरणकुमार साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . किरणकुमार साळवे यांनी आजच  सायंकाळी 6 वाजता ठाणेदार म्हणून पदभार स्वीकारला आहे . याआधी  किरणकुमार साळवे  जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार  असताना त्यांनी  अनेक समाजपयोगी उपक्रम राबविल्याने त्यांची आगळीवेगळी प्रतिमा  जनसामान्याच्या मनात तयार झाली आहे . त्यांना  याभागातील खडान खडा माहिती असल्याने ते नक्कीच या भागातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करतील यात शंका नाही. नवनिर्वाचित ठाणेदार किरणकुमार साळवे यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी आहेत एवढे मात्र निश्चित!

महादेव हरणे 
कार्यकारी संपादक
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा