शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

अमेरीकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प च्या विरोधात जनाक्रोश



तहसिलदार मार्फत सयुक्त राष्ट्र संघ व प्रधानमत्र्यांना निवेदन  

प्रतिनिधी । कारंजा (लाड)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलेमला इस्त्राईलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावा विरोधात शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी जमीयत उलेमा ए हिंद च्या वतीने तहसीलदार कारंजा यांना निवेदन देण्यात आले. 

     निवेदनानुसार ईस्लाम धर्मात जेरूसलेम स्थित मस्जिदे अक्साला अतिश्रय श्रध्देचे स्थान आहे. पैंगबर हजरत मोहम्मद सल्लला अलैवसल्लम यांनी या मस्जीत मध्ये सर्व अबिंयाची ईमामत केली. यामुळे या धर्मस्थळाला संपुर्ण विश्वातील मुस्लीम समाजात असाधारण महत्व आहे. परंतू नुकतेच अमेरीकी राष्ट्राध्यक्ष ट्रंम्प यांनी जेरूस्लेमला ईसराईल देशाची राजधानी घोषीत करण्याचा एकतर्फी निर्णय केला.  त्यामुळे मुस्लीम समाजाच्या धार्मीक भावनांना ठेच पोचली आहे. आॅल इंडीया जमियत उलेमा ए हिन्द नवी दिल्ली च्या निर्देशानुसार स्थानिक जमियत उलेमा ए हिन्दचे अध्यक्ष मौलवी ईमदादुल्ला खान, जामा मस्जिदचे ईमाम व खतीब मौलवी अब्दुल रशीद माजीदी करंजवी यांच्या नेतृत्व शहरातील मौलवीनी तथा शेकडो मुस्लीम बांधवानी तहसीलदाराचा मार्फत संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले.यावेळी निवेदनावर  मुफ्ती मोहसीन खान, मुफ्ती ईलीयास खान, कासमी, मुफ्ती ईलीयास खेतीवाले, मौलावी मजहर मजाहीरी, मुफ्ती अयाज कासमी, हाफीस मौहसीन कुरेशी, मौलवी आरीफ, हाफीज शहजाद, हाफीज मुसद्दीक, हाफीज मुदस्सीर, मुफ्ती उमर, मौलवी फिरोज, मौलवी अब्दुल रहेमान, प्रा. ए.एस.शेख, भारीप जिलाध्यक्ष मो.युसुफ पुजांनी, नगर सेवक व गटनेता फिरोज शेकुवाले, नगर सेवक सलीम गारवे, जाकीर शेख,जाकीर अली, निसार खाॅन, डाॅ. अजमल, डाॅ एजाज खान, डाॅ मकदुम अली, डाॅ अ.मतीन, डाॅ रागेब खाॅन, डाॅ अब्दुल रज्जाक, शकील मिर्झा, डाॅ. मुज्जमिल खान, सलीम तेली, एजाज खान, अन्नु पहेलवान  सलीम प्यारेवाले, रशीद निन्सूरवाले आदी मुस्लीम बांधवांची उपस्थिती होती

सम्राट टाईम्स

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा