शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

ना.ना.मुंदडा विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शनी संपन्न


   स्थानिक ना.ना.मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मालेगांव येथे शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन दि.22 डिसेंबर 2017 रोज शुक्रवारला करण्यात आले.प्रदर्शनीचे उदघाटन संस्थेचे संचालक श्री.रामबाबूजी मुंदडा,व्यवस्थापक श्री.गोविंदजी पुरोहित तसेच संचालक श्री.जगदीशजी बळी यांच्या उपस्थितित संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक श्री. वसंता अवचार सर तर प्रमुख मार्गदर्शक पर्यवेक्षक श्री सुनील राठी सर,उपमुख्याध्यापक श्री. सतीश नवगजे सर मंचावर उपस्तित होते.विज्ञान मंडळ अध्यक्ष श्री.अंभोरे सर तसेच विज्ञान शिक्षक श्री.गजानन पाटिल,सौ.मुंदड़ा मॅडम,सौ.राजपुत मॅडम,,श्री.स्वप्निल जोशी सर,श्री.काटेकर,श्री.परमेस्वर नव्हाळे सर,श्री.काटेकर सर, श्री.मोरे सर,श्री.इन्नानी सर,श्री.अढागळे सर,श्री साबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यानी मॉडेल निर्माण करुण प्रदर्शनीमध्ये सहभाग घेतला.विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन दोन गटामध्ये करण्यात आले.प्रथम गट वर्ग 6 ते 8 व दुसरा गट वर्ग 9 ते 12 तसेच पहिल्या गटामधुन प्रदूषणावर उपाय बनवलेले मॉडेला प्रथम पारितोषिक तुषार विष्णु नरोकार.द्वितीय क्रमांक सोलार पॉवर कार्ट मॉडल बनवनारा अनिरुद्ध मोहन बळी.तृतीय क्रमांक वेस्ट मॅनेज्मेंट मॉडेल प्रथमेश नेवासकर तर प्रोत्साहनपर कु.वेदांगीनि बळी याना प्राप्त झाले.
दुसऱ्या गटामध्ये प्रथम क्रमांक प्रतिक काटेकर व सुरज खटोड़,द्वितीय क्रमांक अभिजित पवार व तुषार तायडे,तृतीय क्रमांक कु.गायत्री शर्मा व कु.सईं अनसिंगकर याना प्राप्त झाले

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याकरिता संदीप अंभोरे,सचिन देवळे,सिद्धार्थ भालेराव यानि अथक परिश्रम घेतले.विषयाची आवड तसेच चिकित्सक व्रुति व वैज्ञानिक दृष्टीकोन विद्यार्थ्यामध्ये निर्माण व्हावा या उद्देशाने आयोजन करण्यात आले.मा.संचालक मंडळाच्या सुचनेनुसार सदर विज्ञान प्रदर्शन दि.6 जानेवारी 2018  श्रद्धेय शेठ नारायणदासजी मुंदड़ा यांच्या स्मुर्ती दिनानिमित्त्य जनतेसाठी खुले करण्यात येईल.

सम्राट टाइम्स न्यूज़ 
सिद्धार्थ भालेराव
9552978172

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा