सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

विवाह निधी नियोजीत वेळेवरच घेण्याचा निर्णय





भारतीय बौध्द महासभेच्या बैठकीत विविध ठराव पारित

विवाह निधी नियोजीत वेळेवरच घेण्याचा निर्णय

धम्म परिषदेत वादग्रस्त वक्त्यांना विषय न देणे

वाशीम - सध्याच्या परिस्थितीत विवाह सोहळ्याचे कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा फार विलंबाने होत असल्याने आमंत्रित समस्त जनतेला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत असून ह्याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ह्यावर आळा घालण्यासाठी बौध्दाचार्य, माजी श्रामनेर व विवाह विधीकार यांची नुकतीच 10 डिसेंबरला सहविचार सभा स्थानिक अशोक वाटीकेत घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष सिध्दार्थ भगत हे होते.

    विधीकारांनी नियोजित वेळेवरच विधी करावा. त्याकरीता तसे विवाह पक्षकारांना प्रवृत्त करावे. बौध्दाचार्यांनी अगोदरच उपस्थित राहून पुजेची मांडणी व योग्य प्रकारे नियोजन करावे. ज्यांचा विवाह कार्यक्रम काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब होत असेल तर तसा विधी करण्यास हरकत नाही. परंतु काही ठोस कारणे नसताना केवळ वाजंत्री, नाचगाणी यामुळे विधीला फार विलंब होत असेल तर अशा प्रकारचे विवाह विधी करु नये. तशी पुर्वीच सुचना विवाह पक्षकारांना देणयात याव्यात. ह्या बाबतचा निर्णय सभेत घेण्यात आला. तसेच विवाह पक्षकार कार्यक्रमासाठी फार अनाठायी खर्च करतो, परंतु विवाह विधीसाठी कोणतेही नियोजन केल्या जात नाही. बौध्दाचार्यांना सांगीतले जात नाही. तसेच फार विलंबामुळे आमंत्रित समस्त जनतेला कशा प्रकारचा त्रास सहन करावा लागतो याची दखल सुध्दा घेतल्या जात नाही ही बाब योग्य नाही. ह्यामुळे धम्माच्या विनयाचे उल्लंघन होत असून आदर्श बौध्द संस्कार विधीला बाधा निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. विवाहप्रसंगी भाषणबाजी करणे, इतरांच्या संस्कारावर टिकात्मक बोलणे, अनाठायी स्वागताचा कार्यक्रम करणे हा प्रकार थांबवुन फक्त विवाह विधीलाच महत्व देण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला. विवाह पक्षकारांनी विधीकरीता बौध्दाचार्यांची निवड पुर्वीच करुन लग्नपत्रिकेत नावाची नोंद करावी. त्यामुळे विधी लावण्यासाठी व्यत्यय येणार नाही. बौध्द संस्कार विधीमध्ये एकसुत्रता आणण्यासाठी ठरवून दिलेल्या गाथाच घेण्यात याव्या. गाण्यांच्या चालीचा उपयोग करु नये. ह्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरीय समित्या गठीत केल्या जातील. जो विधीकार उल्लंघन करेल त्याला जाब विचारल्या जाईल असे सभेत सिध्दार्थ भगत यांनी सांगीतले. बरेच ठिकाणी धम्म परिषद होत आहे तेथे वादग्रस्त वक्त्यांना थारा देवू नये. टिकात्मक भाषणे करणे योग्य नसून वातावरण दुषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे योग्य मार्गदर्शकांना संधी देण्यात यावी व धम्म परिषदेमध्ये राजकीय शिरकाव करु नये. त्यामुळे धम्म परिषदेचे महत्व कमी होत चालले आहे. अशी सखोल चर्चा सभेत करण्यात आली. सभेत झालेल्या निर्णयाचे योग्य पालन करावे असे जिल्हा संस्कार विभाग प्रमुख हरिचंद्र पोफळे यांनी सभेला सुचित केले. यावेळी गोविंदराव इंगळे, संध्याताई पंडीत, डी.एस. कांबळे, शालीकराम पठाडे, पी.के. भगत, हर्षल इंगोले, प्रमिलाताई शेवाळे, छगन सरकटे, पंढरी खिल्लारे,सुमन ताजणे, अश्‍विन खिल्लारे, अभिमन्यु पंडीत,पी.एस. तायडे, प्रभु मोरे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी सहविचार सभेमध्ये नागोराव कांबळे, अ‍ॅड. हिरामण मोरे, सिध्दार्थ पठाडे,छगन सरकटे, संजय मेंदकर, रामजी बनकर,अरविंद उचित, राम काहाळे, कुलदीप सरकटे,आनंद सावळे, महादेव सरकटे, अभिमन्यु पंडीत,सुभाष सरकटे, रमेश सावळे, संदीप सरकटे,ज्ञानबा सरकटे, बळीराम पट्टेबहादूर, अशोक पडघान, रामदास पडघाण, सिंधु सरकटे, इंदूमती जांभरुणकर इत्यादींनी सहविचार सभेत सहभाग घेतला. संचालन व आभार पंढरी खिल्लारे यांनी केले.

सम्राट टाईम्स 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा