२४ डिसेंबर माझ्या बाबांचा वाढदिवस, बाबा म्हणजे माझे मोठे काका माजी सरपंच अशोकराव आनंदराव देशमुख करर्डेकर परिवार मोठा असूनही परिवारासोबत अनेकांना घडविण्याची किमया त्यांनी केली. तिही स्वत: न घडता निस्वार्थपणे आनंदाने!
वडीलोपार्जित शेकडो एकर शेती असल्यामुळे सरकारी नोकरी नाकारली. कमी वयात वडीलाचे निधन झाले सहा भाऊ चार बहिनी सर्वानी एका जिवानी संयुक्त कुटुंब पध्दत स्वीकारली. अति चागुलपना, व नेहमी मदतीस तत्पर असा आमचा मोठा परिवार ! त्यांनी व्यव्हाराची जबाबदारी माझे वडील प्रकाशराव यांच्या वर सोपविली. त्यांनीही सर्वांना विश्वासात घेवून योग्य रित्या सांभाळली. दोघा भावंडानी गावात मागेल त्याला मदत केली. १९७७ च्या काळात स्वत:हाचा मोठा ट्रक मित्राला ठेकेदारीसाठी दिला. शिवाय १९७९ भावाच्या लग्नाच्या हुडांची रक्कमही दिली. रिसोड येथील १९६० मधील एकमेव सिमेंट कॉक्रिटची हवेली मैत्रीसाठी विवूâन टाकली. प्लॉटही नाममात्र विंâमतीत मित्राला दिला. आणि मित्राला मोठे केले. या शिवाय तामझाम मोठा असल्याने अनेक गरजू शेतकNयांना शेताची पेरणीसाठी बैल गाडीसह आपल्या शेतातील गडीमानसेही देवून लहान शेतकNयांना मोठे केले. ज्यांना राहण्यासाठी घर नव्हते ते आमच्या घरी म्हणजे वाड्यात झोपत होते. आमची गच्ची म्हणजे ‘आनंद भवन’ सर्वांसाठी खुले होते. सर्व गावाच्या बैठकी इथेच होत होत्या. दिवसभर येणाNया जाणाNया साठी चहा आणि जेवन करण्यासाठी घरच्या महिलांनी कधीही वंâटाळा केला नाही. दुसNयाना चहा पाजून जेवू घालण्यात किती आनंद मिळतो हे मी घरच्याकडून अनुभवले. समाजकारणासाठी कधीही न आवडणाNया राजकारणात बाबांनी प्रवेश केला आणि सरपंच झाले. २५ ते ३० वर्ष नाममात्र सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष राहीले. तेही ‘रबर स्टॉप’ म्हणून ! मित्रांनी सांगावे आणि बाबांनी करावे ऐवढेच ! अनेकांनी त्यांचा फक्त वापरच केला. हे त्यांना माहित असून त्यांनी कधीही मदत करणे सोडले नाही. हे विशेष.
कारकीर्त सरपंचाची - सरपंचाची धुरा सांभाळतांना गावात अनेक समस्यांनी ग्रस्त होते. पिण्याच्या पाण्यासह रस्ते, विज, नाल्या अशा अनेक समस्या होत्या. त्या त्यांनी हळुहळु दुर केल्या. १ सिंचन तलाव - पाणी समस्या असल्याने हिवाळ्यातच पाणी टंचाई भासत असे. शेतातून पाणी आणावे लागत असे. यासाठी माजी मंत्री, माजी खासदार अनंतरावजी देशमुख यांना भेटून गावासाठी सिंचन तलाव मंजुर करून घेतला. यासाठी गावातील अनेक मंडळींनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या सरपंचाच्या कारकीर्ततच सिंचन तलाव झाला. २. कृषी विज्ञान वेंâद्र - माजी खासदार अनंतरावजी देशमुख यांनी शेतकNयांसाठी कृषी विज्ञान वेंâद्र आणण्याचे ठरविले. सर्वप्रथम तत्कालीन सरपंच अशोकराव देशमुख यांनी ते करड्यात आणण्यासाठी ५५ एकर जमीनीचा ठराव शेतातून दिला. आणि करड्याला उभारणी करण्याची विनंती केली. यावेळी अनेकजण त्यांच्या सोबत होते. अनंतराव भाऊमुळेच जिल्ह्यातील नव्हे राज्यातील शेतकरी याचा लाभ घेत आहेत. ३.नळयोजना - गावात अगोदर नळयोजना होती. पण बाबांनी स्वत:ची गडी मानसे लावून नळयोजना सुरू ठेवली होती. कारण नळयोजनेची ७० टक्के पाईप लाईन आमच्या शेतातून गेलेली होती. त्याची देखभाल दुरूस्ती काका सहीत गडी मानसे करीत होती. त्यामुळे अनेक वर्ष लोकांना नळाद्वारे पाणी पुरवठा करू शकले. ४ जनावरांसाठी पाणी - सिंचन तलाव होण्याअगोदर मानसालाच पिण्यासाठी पाणी मिळत नसेल तर जनावरांना कसे मिळणार आमच्या शेतात विहीरी जवळ आजोबानी एक हौद बांधलेला आहे. तेथे गावातील जनावरे पाणी पिण्यासाठी येतात. हे दुर असल्याने बाबांनी गावातील पाण्याच्या टाकीजवळ मोठा हौद बांधून २४ तास जनावरांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था केली होती. ५. आर.सी.एफ.ला गाव दत्तक -शेतकNयांना विविध योजनेचा लाभ मिळण्यासाठी ९० मध्ये आर.सी.एफ.ला आर.सी.एफ.ला गाव दत्तक देवून आर.सी.एफ. भवन उभारले. ६. पापड उद्योग - त्यावेळी महिलांना रोजगार मिळावा म्हणून पापड उद्योगाच्या इमारतीची उभारणी केली. ७. जनावरांसाठी कोंडवडा ८. अंगणवाडी - ९. पाण्याच्या टाकीखाली गोडावूनची उभारणे १०. विविध योजना - आज ज्या योजना शेतकNयांना मिळत नाही त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ त्यांनी शेतकNयांसह सर्व सामान्यांना दिला. फळबाग योजनेतून बोर, आवळा, संत्री, यांची लागवड केली. स्वत:हून उभे राहून अनेकांच्या शेतात विहिरी खोदून घेतल्या. व निराधारांना घरवूâल बांधून दिले. अशी अनेक कामे बाबांनी केली. कधीही त्याचा गाजावाजा केला नाही. श्रेय घेतले नाही. कित्येक गरीबांच्या लग्नाला मदत, दवाखाण्याला मदत, निराधाराला मदत केली. त्यांच्या बद्दल लिहायचे झाले तर अनेक पुस्तके कमी पडतील. हे मला माहित आहे. त्यांची काळानुसार प्रगती झाली नसेल. पण मनाची श्रिमंती कायम आहे. मी हे लिहले बाबाला आवडत नाही हे मला माहित आहे. तरी त्यांची शमा माघून लिहीतो. माझ्या आक्रमक पणामुळे ते नाराज होतात पण तेच मला प्रेरणा देतात. त्यांच्यामुळेच आज मी कोणाला कोणतीही मदत करू शकतो.
आनंददाई ‘आनंद भवन’ - आमच्या आनंददाई ‘आनंद भवनांत’ मी लहानाचा मोठा झालो. जडण घडणीत आनंद भवाचा मोठा वाटा आहे. त्यांच्या सोबत बाबाचा ! आनंद भवन संपूर्ण गावाचे बैठकीचे ठिकाण वजा ग्रामपंचायातच ! अनेक जण इथेच मोठी झाली. सर्वात मोठे म्हणजे आमचा एवढा मोठा परिवार एकसंघ, निरव्यसनी, मनमिळावू अति चागुलपणा टिवूâन ठेवण्यात बाबांसह आनंद भवनाचा मोठा वाटा आहे. काळानुसार जरी प्रगती कमी झाली असेल पण आमच्या परिवारातील प्रत्येकाची मनाची श्रिमंती कायम आहे. पैसा पेक्षा आनंद भवनामुळे बाबांमुळे आमचा परिवार आनंददाई झाला आहे.
सर्वाना आनंददाई करणाऱ्या
बाबांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !
- आतिष देशमुख
मो.९४०४८३३५७७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा