सीईओ गणेश पाटील यांनी 25 डिसेंबर पासुन दिले मोहिम राबविण्याचे निर्देश
वाशिम :जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी आता एक चुल- एक शौचालय ही नविन मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे ऑन लाईन मधील अतिरीक्त झालेली नावे कमी करुन शौचालयाचे टार्गेट कमी करण्यात येत आहे. ही मोहिम 25 डिसेंबर पासुन सुरु करण्यात आलेली ही मोहिम पुढील 12 जानेवारी पर्यंत उर्वरीत गावात राबविण्यात येणार आहे. प्रत्येक गावात तसेच राहिलेल्या कुटुंबाकडे लाभार्थ्या मार्फत शौचालये बांधण्यात येत आहेत.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रशासनाकडुन मोठया प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. गृहभेटी, स्वच्छता रॅली, लोककलावंतांच्या गृहभेटी, लोक प्रतिनिधी व अधिकारी यांच्या गृहभेटी या विविध माध्यमातुन गावात जाणीवजागृती करण्यात येत आहे. उघड्यावर जाण्याची लोकांची सवय मोडावी यासाठी गुड मॉर्निंग पथके पुन्हा सक्रीय करण्यात आली आहेत. परिणामी गावामध्येही शौचालयाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे दिसुन येत आहे.
अनेक गावांमध्ये प्रत्येक घरी शौचालय असुनही ती गावे ऑन लाईनवर जाहिर करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत बेसलाईन सर्व्हेमध्ये काही नावे डबल झाली आहेत काही चुकीची आहेत, काही कुटुंब अन्यत्र स्थलांतरीत झाले आहेत तर काही कुटुंब प्रमुख मयत झाले आहेत. अशी नावे शोधुन त्यांना कमी करण्यात येत आहे. तसेच गावात एकत्र कुटुंब असुन अशा एक चुल असलेल्या घरातील एकापेक्षा अधिक नावे असल्यामुळे ऑनलाईन टार्गेटमध्ये वाढ झाली आहे. हे वाढीव टार्गेट कमी करुन जिल्हा हागणदारीमुक्त होण्यास मदत होणार आहे.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा