‘यिन’चा उपक्रम : वाहतूक शाखेची साथ
वाशीम : नववर्षाच्या स्वागताला तरुणाई झिंगलेल्या अवस्थेत सामोरी जाते. या अपघात घडतात. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. नववर्षाचे स्वागत आनंद व सात्वीकतेने व्हावे, यासाठी आज (ता. 30) यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क व शहर वाहतूक शाखेच्यावतीने येथील अकोला नाक्यावर दूध वाटप करून व्यसनाविरोधात जनजागृती मोहिम राबविण्यात आली.
नववर्षाचे स्वागत करताना अनेकजण मद्यप्राशन करतात व तसेच वाहन चालवितात. यामुळे अपघात होतात. दारू पिलेला इसम पादचार्यांच्या अंगावर जाऊन पादचार्यांना जीव गमवाव्या लागल्याच्या घटना घडत आहेत. नववर्षाचे स्वागत करताना युवा पिढीने व्यसनापासून दूर राहावे, याबाबत जनजागृती करण्यासाठी वाशीम शहर वाहतूक शाखा व यिनच्या सदस्यांनी येथील अकोला नाका परिसरात वाहनचालकांना दूध देऊन व्यसनाबाबत जनजागृती केली. यावेळी शहर वाहतूक शाखेच्या निरीक्षक ज्योती विल्हेकर, सुनील लठ्ठाड, राहुल वानखेडे, सचिन जाधव, विठ्ठल महाले, दिलीप जाधव, वसंत तहकीक, रवी खडसे, युवराज येरले, स्विटी कुकोडवार, भिंगे, नईम शेख, संतोष इंगोले, विजय इंगोले, ज्ञानदेव काळे, अमोल पवार यांच्यासह ‘यिन‘चे पालकमंत्री भगवान ढोले, शहरी जिल्हाध्यक्ष शरद मोरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कपिल सोळंके, ‘यिन’ सदस्य संदीप राऊत, सुनील मापारी, अंकुश खंदारे, कार्तिक इंगोले, सचिन वानखेडे, नागेश वाहुळे, राजू अबोरे, विकी जगताप, राजू होडगीर, नामदेव वाबळे, प्रिया उमाळे, प्रतीक्षा भगत, मनिषा लोखंडे, प्रज्ञा इंगळे, अर्चना मुंढे, ज्ञानेश्वर इंगोले, आकाश खडसे यांच्यासह 'यिन' चे जिल्हा समन्वयक भागवत मापारी ‘यिन’ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महेंद्रकुमार महाजन जैन
रिसोड प्रतिनिधी 9960292121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा